जाणून घ्या, पॅलेस्टिनी पत्रकाराने मोदींशी संबंधित एका प्रश्नावर संयुक्त राष्ट्राकडून काय आली प्रतिक्रिया
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : United nations संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी मंगळवारी सांगितले की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर जगाची परिस्थिती चांगली आहे.United nations
तसेच, “आम्हाला आशा आहे की युद्धबंदी कायम राहील, त्याच वेळी, आम्हाला आशा आहे की दोन्ही बाजू त्यांच्यातील अनेक प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी याचा वापर करतील. असेही दुजारिक यांनी आपल्या ब्रीफिंगमध्ये सांगितले.
पॅलेस्टिनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले की युद्धबंदी कायम आहे. खरंतर, पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. पत्रकाराने म्हटले होते की पंतप्रधान मोदींच्या सोमवारीच्या भाषणातून असे दिसून येते की युद्धबंदी खूपच नाजूक स्थितीत आहे. तसेच आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ, पत्रकाराने एका पाकिस्तानी विधानाचाही उल्लेख केला ज्यामध्ये पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आला होता. परंतु यावर दुजारिक यांनी सांगितले की, आपण पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहोत.
पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालनालयाने (डीजीएमओ) भारतातील त्यांच्या समकक्षांना फोन केल्यानंतर १० मे रोजी चार दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यावर सहमती झाली.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली होती, याचा बदला घेण्यासाठीच भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राईक केले. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ले सुरू केले होते, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती. मात्र भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानला अखेर माघार घ्यावी लागली.
युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर लगेचच, गुटेरेस यांनी त्याचे स्वागत केले आणि सध्याचे शत्रुत्व संपवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले. तसेच यापूर्वी देखील, जेव्हा संघर्ष वाढत होता, तेव्हा त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. जगाला भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष परवडू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App