ओळखपत्र बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार? समजून घ्या कशी आहे प्रक्रिया?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’, ‘वन नेशन-वन टॅक्स’ नंतर आता ‘वन नेशन-वन हेल्थ कार्ड’ या योजनेचा आज शुभारंभ होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने एक योजना सुरू केली आहे. योजनेचं नाव आहे राष्ट्रीय संगणकीकरण आरोग्य अभियान! ((National Digital Health Mission-NDHM)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑग्सट २०२० रोजी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली होती. सध्या ही योजना देशातील अंदमान-निकोबार, चंदीगढ, दादरा व नगर हवेली, दमण-दीव, लडाख आणि लक्षद्वीप या ठिकाणी पायलट प्रोजेक्ट स्वरूपात राबवली जात आहेत.
केंद्र सरकारने देशात एकात्मिक संगणकीकृत आरोग्य सुविधा तयार करण्याच्या उद्देशानं हे अभियान सुरू केलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांकडे यूनिक हेल्थ कार्ड दिलं जाणार आहे. या कार्डमध्ये संबंधित व्यक्तीच्या आरोग्याबद्दलची (आजार व उपचार, शारीरिक व्याधी आणि उपचार आदी) संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे.
एखादी व्यक्ती जेव्हा आजारी पडते. तेव्हा त्या व्यक्तीला फाईल घेऊन जावं लागतं. त्या फाईलमध्ये जुन्या तपासण्यांचे वा आजाराच्या निदानाबद्दलचे रिपोर्टस असतात. याच फाईलचं डिजिटल रुप म्हणजे हे आरोग्य ओळखपत्र असणार आहे. आधार कार्डाप्रमाणे १४ अंकी यूनिक ओळखपत्र नागरिकांना दिलं जाणार आहे.
याच १४ अंकी कार्डमध्ये त्या व्यक्तीच्या आजाराच्या, चाचण्यांच्या आणि उपचाराच्या नोंदी घेतल्या जातील. हे कार्ड केंद्रीय सर्व्हरला जोडलेलं असणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही उपचार घेण्यासाठी गेल्यास मागील रिपोर्टस दाखवण्यासाठी या कार्ड गरजेचं ठरणार आहे. या कार्डावरील क्रमांकावरून डॉक्टरांना लगेच तुमच्या जुन्या आजारांविषयी वा हेल्थ हिस्ट्रीबद्दल माहिती कळेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App