अयोध्येत रामजन्मभूमी स्थानी राम जन्माचा अनुपम सोहळा!!; लाखो भाविक रमले रामनामात!!

प्रतिनिधी

अयोध्या : अयोध्येत रामजन्मभूमी स्थानी रामजन्माचा अनुपम सोहळा आज रंगला. पहाटेपासूनच रामजन्मभूमी परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. बरोबर दुपारी 12.00 वाजता राम नामाच्या गजरात राम जन्म सोहळा झाला. श्रीरामाची आरती मोठ्या उत्साहात करण्यात आली. त्यानंतर भक्तांना धनिया पिंजर प्रसाद देण्यात आला. Unique ceremony of Ram’s birth at Ram Janmabhoomi in Ayodhya

असाच सोहळा अयोध्येतील श्री दशरथ यांच्या कनक भवनामध्ये रंगला होता. कनक भवनामध्ये शेकडो कलाकारांनी राम जन्मानिमित्त आपल्या विविध कला सादर करून रामजन्माचा सोहळा साजरा केला. अयोध्येत रामनवमीनिमित्त सुमारे 5 लाख भाविक जमले आहेत. सगळीकडे रामनामाचा आणि राम संकीर्तनाचा गजर ऐकू येत आहे.

– नाशिक, शिर्डी, शेगाव मध्ये उत्साह

राम जन्माचा उत्साह महाराष्ट्रात नाशिकच्या काळाराम, गोराराम तसेच अन्य राम मंदिरांमध्ये दिसला. त्याचबरोबर शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तसेच शेगावच्या संत गजानन महाराज मंदिरात देखील मोठ्या उत्साहात राम जन्म सोहळा झाला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात राम जन्म सोहळा अनुभवण्यासाठी लाखो भाविकांनी या सर्व मंदिरांमध्ये हजेरी लावून राम दर्शन घेतले. अनेक ठिकाणी भक्तांनी भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकांमध्ये लाखो राम भक्त सामील झाले.

थोर राम भक्त संत गोंदवलेकर महाराजांच्या गोंदवलेमधील श्रीराम मंदिरांमध्ये देखील प्रचंड उत्साहात भाविकांनी राम जन्म सोहळा साजरा केला. हजारो राम भक्तांनी दिंडी काढून थोरल्या आणि धाकट्या राम मंदिरात पारंपारिक पद्धतीने राम जन्म सोहळा साजरा केला.

Unique ceremony of Ram’s birth at Ram Janmabhoomi in Ayodhya

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात