प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये एनडीआरएफचा स्वतंत्र बेस असावा, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली.Union home minister amit shah gave positive response to Maharashtra’s demands, says MP sunil tatkare
त्याचबरोबर शरद पवार यांनी साखरेचे भाव वाढवून द्यावेत. आणि नवीन इथेनॉल पॉलिसी केंद्रसरकारने आणावी अशा मागण्या अमित शहा यांच्याकडे केल्या. महाराष्ट्राच्या या मागण्यांना अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती सुनील तटकरे यांनी या भेटीनंतर पत्रकारांना दिली
सुनील तटकरे म्हणाले, की दर वर्षी येणारा पूर आणि या वर्षीचा पूर त्यात झालेली वित्त आणि जीवित हानी मोठी आहे. एनडीआरएफच्या मदतीचे निकष बदलण्यात यावे अशी विनंती आम्ही शहा यांना केली ती त्यांनी मान्य केली. त्यांचा प्रतिसाद या बाबत अतिशय सकारात्मक होता.
एनडीआरएफचा बेस कँम्प महाडमध्ये असावा अशी मागणी केली. त्याला राज्य सरकारने जागा उपलब्ध करून दिली आहे. केंद्र सरकारने तातडीने मंजुरी द्यावी या संदर्भात सुद्धा गृहमंत्री सकारात्मक होते, असे ते म्हणाले.
साखरेची किंमत वाढवून द्यावी तसेच केंद्राने नवीन इथेनॉल वापराची पॉलिसी आणावी. या संदर्भात सुद्धा सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष भाजप पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संदर्भात आरडाओरडा करत आहे.
पण नुकसानीची व्याप्ती मोठी असल्यामुळे पंचनामा करायला वेळ लागला आणि तो निर्णय योग्यच होता कारण त्यामुळे च नुकसानीची व्याप्ती कळू शकली, असे सुनील तटकरे म्हणाले.
सुनील तटकरे म्हणाले…
या विषयी तातडीने केंद्र सरकारने पाऊल उचलले पाहिजे. शरद पवार आणि मी तो मुद्दा मांडला आणि अमित शहा हे सकारात्मक आहेत आणि लवकरात लवकर पाऊल उचलतील अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App