‘फक्त पाकिस्तानच नाही तर सर्व देशांनी मिळून जरी भारतावर हल्ला केला तरी…’, अमित शाहांचं विधान!

नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे केले आवाहन

विशेष प्रतिनिधी

गांधीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (१३ ऑगस्ट) गुजरातमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना तरुणांना विशेष आवाहन केले. ते म्हणाले, “फक्त पाकिस्तानच नाही तर सर्व देश मिळून जरी भारतावर हल्ला केला, तरी त्यात त्यांना यश नाही आले पाहिजे, अशा प्रकारची सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी तरुणांची आहे.” अमित शाह यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस होता. Union Home Minister Amit Shah appealed to the youth to protect India

गांधीनगर लोकसभा मतदारसंघात त्यांनी पायाभरणी आणि विविध विकासकामांचे उद्घाटन केले. ८५ कोटींहून अधिकच्या विकासकामांचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमित शाह यांनी सर्व लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना ते म्हणाले, “नऊ वर्षात नरेंद्र मोदींनी जगभरात भारताचा नावलौकिक वाढवला आहे. पंतप्रधानांनी भारतीय  अर्थव्यवस्थेला ११व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणले आहे.’’ तत्पूर्वी, हर घर तिरंगा अभियानांतर्गत अहमदाबादमध्ये आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले होते की, गुजरातची लोकसंख्या ६ कोटी आणि सुमारे १ कोटी कुटुंबे आहेत. प्रत्येक घरात तिरंगा फडकवला तर संपूर्ण गुजरात आणि देश तिरंगामय होईल.

Union Home Minister Amit Shah appealed to the youth to protect India

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात