वृत्तसंस्था
हैदराबाद : सिकंदराबाद कँटमधील बीआरएस आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. आमदार त्यांच्याच गाडीतून प्रवास करत होते. संगारेड्डीतील अमीनपूर मंडल भागात सुलतानपूर आऊटर रिंग रोड (ओआरआर) वर त्याच्या कारचे नियंत्रण सुटले आणि दुभाजकावर आदळली. Uncontrolled car hits divider, BRS woman MLA Lasya Nandita dies in road accident
या अपघातात आमदार लस्या नंदिता गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात त्यांचा कार चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
केसीआर यांनी व्यक्त केला शोक
बीआरएस प्रमुख केसीआर यांनी लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, तरुण आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याने मला दु:ख झाले आहे. या दु:खाच्या काळात त्यांच्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत.
‘काँग्रेसला मत दिल्यास ‘TRS, BRS’ला जाईल’ तेलंगणात अमित शाहांचं विधान!
नंदिताच्या निधनाने मला खूप धक्का बसला : मुख्यमंत्री
तरुण आमदाराच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना तेलंगणाच्या मुख्यमंत्री रेवंती रेड्डी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, कॅन्टच्या आमदार लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाने मला खूप धक्का बसला आहे. नंदिताचे वडील सायन्नांशी माझे जवळचे नाते होते. मागच्या वर्षी याच महिन्यात त्यांचं निधन झालं… त्याच महिन्यात नंदिताचाही अचानक मृत्यू झाला हे खूप दु:खद आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करतो… त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App