युक्रेनच्या ५३ ऐतिहासिक वास्तू युद्धानंतर नष्ट

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : युक्रेनमध्ये सुरू झालेले युद्ध ३८ व्या दिवसापर्यंत पोहोचले आहे. युनेस्कोचा दावा आहे की युक्रेनमधील ५३ ऐतिहासिक वास्तू युद्धानंतर पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. यामध्ये २९धार्मिक स्थळे, १६ ऐतिहासिक वास्तू, चार संग्रहालये आणि चार स्मारकांचे नुकसान झाले आहे. Ukraine’s 53 historic buildings destroyed after the war

आज रुसो- युक्रेन युद्धाचा ३८ वा दिवस आहे. दोन्ही देश अजूनही मागे हटायला तयार नाहीत. एकीकडे कीववर हल्ला न करण्याचे आश्वासन देऊनही रशिया गोळीबार करत असतानाच पहिल्यांदाच युक्रेननेही रशियाच्या हद्दीत हवाई हल्ला केला आहे. युक्रेनने तेल डेपोवर हल्ला केल्याचा दावा रशियन गव्हर्नरने केला. मात्र, युक्रेनने याचा इन्कार केला आहे.

निप्रो आणि पोल्टावा वर रशियन क्षेपणास्त्रांचा हल्ला

रशियाने १ एप्रिलच्या रात्री युक्रेनियन शहर निप्रो वर किमान १० हवाई हल्ले केले. पोल्टावा प्रमुख दिमित्रो लुनिन यांनी सांगितले की, आज पोल्टावा शहराला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.



युक्रेनने तेल डेपोवर हवाई हल्ल्याचा इन्कार केला आहे युक्रेनने युक्रेनच्या सीमेपासून ३० किमी अंतरावर असलेल्या बेल्गोरोड या रशियन शहरावरील हवाई हल्ल्याचा इन्कार केला आहे. युक्रेनच्या एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, रशियाच्या तेल डेपोवर झालेल्या हल्ल्यामागे युक्रेनच्या हेलिकॉप्टरचा हात नव्हता. तथापि, एक दिवस आधी, रशियन गव्हर्नर म्हणाले की युक्रेनच्या हेलिकॉप्टरने तेल डेपोवर हल्ला केला. खार्किवमध्ये सर्वाधिक नुकसान- युनेस्कोच्या मते, रशियन हल्ल्यात युक्रेनच्या खार्किवला सर्वाधिक नुकसान झाले आहे. येथे १८ ऐतिहासिक स्थळांचे नुकसान झाले आहे.

रशिया करू शकतो केमिकल अॅटॅक – US यूक्रेनवर रशिया केमिकल अॅटॅक करू शकतो असा दावा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने केला आहे. अहवालानुसार, अशा स्थितीत अमेरिका युक्रेनला रासायनिक शस्त्रेही देऊ शकते. याशिवाय युक्रेनला लष्करी मदतीसाठी अमेरिकेने ३०० डाॅलर दशलक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे.

Ukraine’s 53 historic buildings destroyed after the war

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात