वृत्तसंस्था
कीव्ह : युक्रेनने ( Ukraine ) शनिवारी रात्री 150 हून अधिक ड्रोनने रशियावर हल्ला केला. अडीच वर्षांच्या रशिया-युक्रेन युद्धात पहिल्यांदाच युक्रेनने एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोनने रशियावर हल्ला केला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोवरही युक्रेनने ड्रोन हल्ले केले.
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरावर 11 ड्रोनने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये तेल शुद्धीकरण केंद्र आणि एका तांत्रिक कक्षाला लक्ष्य करण्यात आले. तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ल्यानंतर स्फोट झाला. यानंतर दाट धुराचे लोट उठताना दिसत होते.
रशियन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनने 15 प्रांतांवर 158 ड्रोनने हल्ला केला. ते म्हणाले की रशियन हवाई संरक्षणाने रोखले आणि जवळजवळ सर्व ड्रोन पाडले. या हल्ल्यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. या हल्ल्याबाबत युक्रेनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
रशियाने खार्किववर क्षेपणास्त्रे आणि गाईड बॉम्ब टाकले
युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाने रविवारी युक्रेनचे दुसरे मोठे शहर खार्किववर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा आणि गाईड बॉम्बचा पाऊस पाडला. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यात किमान 47 लोक जखमी झाले आहेत. त्यात 5 मुलेही आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या आणखी वाढू शकते.
रशियन हल्ल्यात खार्किवमध्ये 10 ठिकाणी स्फोट झाले. ४८ तासांत रशियाचा हा दुसरा मोठा हल्ला आहे. याआधी शुक्रवारी झालेल्या हल्ल्यात युक्रेनमधील 6 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये एका 14 वर्षाच्या मुलीचाही समावेश होता. तर 59 जण गंभीर जखमी झाले आहेत.
या हल्ल्यात 12 मजली निवासी इमारत आणि मुलांचे उद्यान उद्ध्वस्त झाले. 13 लाख लोकसंख्या असलेले हे शहर रशियन सीमेपासून अवघ्या 25 मैलांवर आहे.
युक्रेनला रशियात आणखी घुसून हल्ला करायचा
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना आता रशियात घुसून हल्ला करायचा आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, ते यासाठी अमेरिकेवरही मदतीसाठी दबाव आणत आहेत. झेलेन्स्कीने शनिवारी एक व्हिडिओ जारी केला आणि सांगितले की 30 ऑगस्ट रोजी रशियाने खार्किववर हवाई हल्ला केला, ज्यामध्ये 6 युक्रेनियन ठार झाले. तर 97 जण जखमी झाले आहेत.
युक्रेनने रशियन एअरफील्ड आणि लष्करी तळांना लक्ष्य केले तरच हे हल्ले थांबवता येतील, असे झेलेन्स्की म्हणाले. आम्ही आमच्या भागीदार देशांशी दररोज चर्चा करत आहोत. यासाठी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App