विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय फौजांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर भारताने पाकिस्तान वरची सैन्य कारवाई सध्या थांबवली. पण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली. ती आपण घडवून आणली असा दावा करत श्रेय घेण्याची धडपड केली, पण त्या पाठोपाठ ब्रिटनने सिंधू जल करारात लुडबुड चालवलीय.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय फौजी ऑपरेशन सिंदूर मधून पाकिस्तानात तब्बल नऊ शहरांमध्ये दहशतवादी आड्ड्यांवर अचूक हल्ले केले. शंभर पेक्षा जास्त दहशतवादी ठार मारले. पाकिस्तान मधल्या हवाई तळांवर हल्ले करून ते तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना धक्का पोहोचवला. त्यामुळे पाकिस्तान हादरला. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी अमेरिकेकडे धाव घेतली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी दोन्ही देशांमधल्या नेत्यांशी शस्त्रसंधी विषयावर चर्चा केली. पण तोपर्यंत भारतीय फौजांनी पाकिस्तानातले आपले टार्गेट पूर्ण केले होते. त्यामुळे भारताने सैन्य कारवाई थांबवली. पण सैन्य कारवाई थांबवल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेण्यासाठी धडपडाट केला. अर्थातच भारताने भूमिका बदलली नाही. त्यामुळे अमेरिकेचे नेतृत्व expose झाले.
पण यातून धडा घेण्याऐवजी ब्रिटनने आता सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर लुडबुड करायला सुरुवात केली. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी इस्लामाबादला गेले. तिथे त्यांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांशी चर्चा केली आणि सिंधू जल करार संबंधित देशांनी जसाच्या तसा पाळावा, असे आवाहन केले.
भारताने मारले फाट्यावर
वास्तविक सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातला द्विपक्षीय करार असून भारताने तो पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर स्थगित केला. त्याचा पाकिस्तानला खरा धक्का बसला. कृषी क्षेत्रातले आपले दीर्घकालीन नुकसान होणार म्हणून पाकिस्तान हडबडला. त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी जगातल्या देशांना यात लक्ष घालायला सांगितले. म्हणून ब्रिटन सारख्या छोट्या देशाने त्या करारात लुडबुड सुरू केली. पण भारताने ब्रिटनच्या सूचनेला कानाआड करून त्या देशाला त्याची छोटी जागा दाखवून दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App