राष्ट्रपतींच्या नियुक्तीने उज्ज्वल निकम, सदानंद मास्टर, मीनाक्षी जैन, हर्ष शांग्रीला राज्यसभेवर

Ujjwal Nikam

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना धडकी भरवणारे वकील उज्ज्वल निकम, केरळमध्ये मार्क्सवाद्यांविरुद्ध प्रचंड संघर्ष करणारे सदानंद मास्टर, इतिहासकार मीनाक्षी जैन आणि माजी परराष्ट्र सचिव हर्ष श्रांग्रीला यांची राष्ट्रपतींनी राज्यसभेवर निवड केली.Ujjwal Nikam, Sadanand Master, Meenakshi Jain, Harsh Shangrila to Rajya Sabha by appointment of President

राष्ट्रपतींनी निवड केलेले हे सगळे नेते आपापल्या क्षेत्रांमध्ये दिग्गज म्हणले जातात. उज्ज्वल निकम यांनी दहशतवाद्यांना धडकी भरवणारी कामगिरी केली. मुंबई बॉम्बस्फोटापासून ते मुंबईवरच्या हल्ल्यापर्यंतचे अनेक खटले लढवून दहशतवाद्यांना त्यांनी शिक्षा दिली. उज्ज्वल निकम यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु फार थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. राष्ट्रपतींनी त्यांची राज्यसभेवर निवड करून त्यांच्या कार्याला न्याय दिला.



सदानंद मास्टर यांनी केरळ मधल्या मार्क्सवाद्यांशी जबरदस्त संघर्ष केला. या संघर्षात त्यांना पाय गमवावे लागले तरी ते मागे हटले नाहीत. त्यांनी संघ आणि भाजपचे काम सोडले नाही. केरळ मधल्या कुन्नूर मधून भाजप नेत्यांना लोकसभेच्या निवडणुकीत उतरविले होते. परंतु मार्क्सवाद्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना मर्यादेपलीकडे यश आले नाही. पण त्यांनी संघर्ष सोडला नाही. सदानंद मास्टर तर राज्यसभेचे खासदार असणार आहेत.

हर्ष श्रांग्रीला हे भारताचे परराष्ट्र सचिव होते. त्याआधी भारताचे चीन आणि अमेरिकेतील राजदूत होते. मोदी सरकारच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाचे वाहक म्हणून त्यांची ओळख आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर मोदी सरकारने वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलेल्या डिप्लोमॅटिक मिशनचे ते प्रमुख होते.

मीनाक्षी जैन या भारतीय दृष्टिकोन जगासमोर आणून इतिहास मांडणाऱ्या इतिहासकार आहेत. त्यांनी इतिहासाच्या मांडणीतली मार्क्सवादी विचारसरणी भेदून भारतीय इतिहासाची मांडणी केली. मुघल हे आक्रमकच होते. त्यांचा या देशाशी काहीही संबंध नव्हता. त्यांच्यातले तथाकथित धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते प्रत्यक्षात धर्मांध राज्यकर्तेच होते. मुघल आणि इंग्रजी या दोन्ही राजवटी भारताचे शोषण करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी भारताचे कुठलेही हित साधले नाही, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी पुराव्यांनिशी केले.

राष्ट्रपतींनी या सर्वांची राज्यसभेवर निवड करून त्यांच्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली.

Ujjwal Nikam, Sadanand Master, Meenakshi Jain, Harsh Shangrila to Rajya Sabha by appointment of President

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात