वृत्तसंस्था
नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच UGC ने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शैक्षणिक संस्थांमधून प्रवेश रद्द केल्यास किंवा परत घेतल्यास संबंधित विद्यार्थ्याला त्याचे संपूर्ण शुल्क परत द्यावे, असे UGC ने सांगितले आहे. मात्र, विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये प्रवेश मागे घेतल्यास संबंधित विद्यार्थ्याला १ हजारांपेक्षा अधिक रक्कम वजा करून शुल्क परत केले जाईल, असेही UGC ने स्पष्ट केले आहे.UGC relief to students; In case of cancellation of admission, full fee will be refunded!!
पालकांच्या आर्थिक अडचणी टाळण्यासाठी यूजीसीने हा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश रद्द झाल्यावर संपूर्ण शुल्क परत देण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या काळात शैक्षणिक संस्था बंद असताना विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन होत होते तेव्हा उच्च शैक्षणिक संस्थांनी वसतिगृह आणि मेसचे शुल्क आकारले होते. याबाबत बहुतांश विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे पैसे परत करावेत किंवा सध्याच्या फी मध्ये मागचे पैसे समायोजित करावे, असे निर्देश युजीसीने दिले आहेत.
मुदतीनंतर प्रवेश मागे घेतल्यास…
३१ ऑक्टोबरची मुदत संपल्यानंतर प्रवेश मागे घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शुल्कातून १ हजार रुपये वजा करण्यात येतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App