प्रतिनिधी
मुंबई : आता शिवसेना संपली आहे, काही राहिलेले नाही. निवडणुकीपर्यंत उरलेले १५ जणही त्यांच्याकडे राहत नाहीत. पक्षाची वाताहत नाही तर याताहत झाली आहे. उद्धव ठाकरे यांची ताकद नाही. मंत्रालयात यायची ताकद नव्हती. २० पावले चालू शकत नाही आणि घणाघात केला अशी बातमी पत्रकार देतातच कसे? आक्रमक शिवसैनिकांमुळे शिवसेना घडली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कुणाला कानफटातही मारली नाही, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.Uddhav Thackeray is short of breath even if he walks 20 steps says narayan rane
पूर्वी शिवसेनेची सभा आयोजित केली जायची, खेडला शिवसेनेची सभा आयोजित केली की सगळेजण जायचे. आता सभेचे आयोजन होत नाही. मुंबईवरून इतके, रायगडवरून इतके, रत्नागिरीवरून इतके. दोन खुर्च्यांमध्ये ५-६ माणसे झोपतील इतकी जागा सोडली होती आणि म्हणे विराट सभा. खेडची सभा काही विराट वगैरे नव्हती.
स्थानिक माणसे सभेला नव्हती. उद्धव ठाकरे काय बोलणार, त्यांनी अडीच वर्षांत काही केले नाही. ते लोकांना काय सांगणार? कोकणात अतिवृष्टी झाली होती, त्याचे पैसे अद्याप आले नाहीत. काय दिले कोकणाला? कोणत्या नवीन योजना कोकणाला दिल्या? त्या माणसाकडून काय अपेक्षा ठेवणार?, असेही केंद्रीय मंत्री राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App