वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सन २०२२ च्या पहिल्या सहामाहीत होणाऱ्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणूकांचे केंद्रीय पातळीवरील होम वर्क भारतीय जनता पार्टीने सुरू केले असून पक्षाच्या अतिवरिष्ठ नेत्यांची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज मुख्यालयात घेतली.Uddhav Thackeray Chief Minister and two Deputy Chief Ministers of BJP !, Discussion of early political earthquake in Maharashtra
बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, पेट्रोलियमंत्री धर्मेंद्र प्रधान, मंत्री प्रल्हाद जोशी, स्मृती इराणी, पियूष गोयल, मनसुख मांडविया, किरण रिजीजू, हरदीप सिंग पुरी आदी मंत्रिगण उपस्थित होते. या बैठकीत पक्षाच्या सर्व सरचिटणीसांचा देखील समावेश होता.
पक्षाचा कार्यक्रम आणि त्याची विविध मंत्रालयांमार्फत होणारी अंमलबजावणी या विषयावर बैठकीत व्यापक विचारविनिमय झाला. केंद्र सरकारने जनतेसाठी लागू केलेल्या विविध विकास आणि सेवा योजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि मंत्री यांच्यातील समन्वय वाढविण्यासाठी कोणते उपाय योजता येतील, यावर मंत्री आणि सरचिटणीसांनी आपले विचार मांडले.
Visuals from meeting called by BJP national president JP Nadda at the party's headquarters today. Union Ministers & party leaders Rajnath Singh & Amit Shah were also present. Meeting discussed coordination b/w party & govt & how social welfare schemes benefitted maximum people pic.twitter.com/AjFUoUajJa — ANI (@ANI) June 26, 2021
Visuals from meeting called by BJP national president JP Nadda at the party's headquarters today. Union Ministers & party leaders Rajnath Singh & Amit Shah were also present.
Meeting discussed coordination b/w party & govt & how social welfare schemes benefitted maximum people pic.twitter.com/AjFUoUajJa
— ANI (@ANI) June 26, 2021
या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व सरचिटणीसांची स्वतंत्र बैठक देखील घेतली. यामध्ये पक्ष संघटनेचा राज्यवार आढावा घेण्यात आला. ज्या राज्यांमध्ये निवडणूका आहेत, त्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्या आढाव्यावर अधिक भर देण्यात आला. कारण २०२२ च्या मार्च – एप्रिलमध्ये या राज्यांमध्ये निवडणूका अपेक्षित आहेत.
तर २०२२ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणूका होणे अपेक्षित आहे. जम्मू – काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात मतदारसंघांची फेररचना झाली, तर तेथे देखील निवडणूक अपेक्षित आहे.या सर्व निवडणूकांच्या मुद्द्यावर भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांनी आणि सरचिटणीसांनी व्यापक विचार विनिमय केला आहे. आज याची सुरूवात झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App