नाशिक : दुसरी फाटाफूट दिसायला लागल्याबरोबर बांधबंदिस्ती; उद्धव ठाकरेंनी वाढविल्या शिवातीर्थावरच्या भेटी!!, असेच उद्धव ठाकरेंच्या आजच्या शिवतीर्थ भेटीचे वर्णन करता येईल. उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. गणपतीच्या दर्शनानंतर ते दुसऱ्यांदा शिवतीर्थावर गेले. या भेटीतून दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला बळ मिळणार असले, तरी ते दोघांच्या बंधू प्रेमापेक्षा राजकीय गरजेपोटी अधिक आहे, हे वास्तव त्यामुळे लपून राहायचे कारण नाही. Uddav Thackrey
काल उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक दिल्लीत झाली. त्यावेळी INDI आघाडीची मते फुटली. त्यामध्ये फुटण्यामध्ये उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे दहापैकी पाच-सहा खासदार फुटल्याचे बोलले गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे आज शिवतीर्थावर राज ठाकरे यांना भेटायला गेले. दोन्ही भावांमधली चर्चा अजून बाहेर आली नाही, पण दोघांनी महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसे यांची युती जाहीर करण्यासाठी ही भेट घेतली, असे उत्साही मराठी माध्यमांनी समोर आणले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची महापालिका निवडणुकीत युती होवो किंवा न होवो, आता दोघांमधले बर्फ वितळले आहे. किंबहुना दोघांमधले बर्फ वितळल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, म्हणून ते बर्फ वितळले आहे.
उद्धव ठाकरे अतिरिक्त वाकले
पण त्यापलीकडे जाऊन उद्धव ठाकरे अतिरिक्त वाकले. कारण दुसऱ्या फाटाफुटी नंतरची बांधबंदिस्ती करणे त्यांना भाग पडले. पहिल्या फुटी मध्ये एकनाथ शिंदे हे अखंड शिवसेनेचे बहुसंख्य आमदार घेऊन बाहेर पडले. त्यामुळे शिवसेनेची सत्ता गेली, पण लोकसभा निवडणुकीत ते नुकसान भरून आले. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जास्त खासदार निवडून आले. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा शिवसेना नावाचा पक्ष टिकला. पण तो पुन्हा उभारी घेताना विधानसभा निवडणुकीत मात्र पराभूत झाला. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतली गळती वाढत गेली. स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरेंची प्रत्येक शहरांमध्ये वाताहत झाली.
खासदार पुन्हा फुटण्याआधीची भेट
त्यापलीकडे उद्धव ठाकरेंचे मशाल चिन्हावर निवडून आलेले खासदारही आता त्यांच्याकडे उरले नाहीत असे चित्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर निर्माण झाले. आपल्या शिवसेनेतली दुसरी मोठी फूट त्यांच्या डोळ्यासमोर चमकली. पण ही शिवसेनेतली ही दुसरी फूट अधिकृतरित्या पडण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थ गाठले. राज ठाकरे यांच्याबरोबर युती होईल आणि महापालिका निवडणुकीत पुन्हा फिनिक्स भरारी घेता येईल, अशी लालूच त्यांनी संभाव्य फुटी मध्ये सामील होणाऱ्या खासदारांना दाखविली. यापलीकडे या भेटीचा सध्या तरी दुसऱ्या कुठला अर्थ काढता येत नाही.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App