गोळीबारामागे पैशांचा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दक्षिण पश्चिम दिल्लीतील आरकेपुरम भागात गोळीबारात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या दोन्ही महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. गोळीबारामागे पैशांचा वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. Two women killed in firing in Delhis RKpuram area
ललित नावाच्या व्यक्तीने दावा केला की तो एका मुलाकडे पैसे मागण्यासाठी गेला होता. यानंतर ललित त्यांच्या घरी आला. थोड्यावेळाने बरेच लोक त्याच्या घरी पोहोचले आणि दरवाजा जोरात वाजवू लागले. त्याने दार उघडल्यावर ते लोक परत गेले. मात्र काही वेळाने ते पुन्हा परतले आणि त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात ललितच्या दोन बहिणींना गोळी लागली. ललितने सांगितले की, त्याच्या एका बहिणीच्या छातीत गोळी लागली, तर दुसऱ्या बहिणीच्या पोटात गोळी लागली.
या गोळीबारात ललितने कसातरी पळून आपला जीव वाचवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी लागून मृत्यू झालेल्या महिलांच्या भावाशी हल्लेखोरांचे भांडण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या दुहेरी हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्य शूटर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. अर्जुन आणि मायकल अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. अर्जुन हा या प्रकरणातील मुख्य शूटर आहे. दुसरीकडे ललितवरही गुन्हे दाखल असून, तो जामिनावर बाहेर आहे. ललितने ज्याला पैसे दिले होते तो बेटिंगमध्ये गुंतलेला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App