सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला असून शोधमोहीम तीव्र केली आहे.
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : बारामुल्ला येथील पट्टण भागातील क्रीरी गावात बुधवारी (3 मे) रात्री लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. Two terrorists were killed in an encounter in Jammu and Kashmirs Baramulla
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली होती. या कारवाईत त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून कारवाईत एक एके 47, एक पिस्तूल आणि इतर दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच शोध मोहीम अजूनही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला असून शोधमोहीम तीव्र केली आहे. अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी गावात शोधमोहीम राबवली, त्यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी खोऱ्यात अनेक दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. ज्याला संपवण्यासाठी सुरक्षा दल शोधमोहीम राबवत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App