विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – जम्मू काश्मीtरात लष्करे तय्यबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले तर दोन नागरिकांचा मृत्यू झाला. सोपोरच्या आरामपोरा येथील तपासणी नाक्यावर दहशतवाद्यांनी आज सकाळी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त तुकडीवर हल्ला केला.Two police died in terrorist attack in JK
यात दोन पोलिस कर्मचारी हुतात्मा झाले तर दोन नागरिक मृत्युमुखी पडले.याशिवाय पोलिसांसह तीन जण जखमी झाले. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस महासंचालक विजय कुमार म्हणाले, हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने परिसराला वेढा घातला आणि तेथून दहशतवादी वाचणे अशक्य आहे.१४ मार्चला देखील सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक झाली होती.
यात सुरक्षा दलाने दहशतवाद्याला ठार केले होते. ही तपासणी मोहीम शोपियॉंच्या रावळपोरा भागात राबवली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लष्करे तय्यबाचा दहशतवादी जहांगीर अहमद वणीला ठार करण्यात यश आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App