वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी 2022 मध्ये शेतकरी आंदोलन दडपण्यासाठी ट्विटर सारख्या सोशल मीडियावर दबाव आणला होता. सरकार सातत्याने ट्विटरला धमक्या देत होते, असा दावा ट्विटरचा सह संस्थापक जॅक डोर्सी यांनी केला आहे. मात्र हा दावा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पूर्णपणे फेटाळला असून ट्विटरचा काळा इतिहास झाकण्यासाठीच जॅक डोर्सी हा दावा करत असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे.Twitter co-founder Jack Dorsey claims Modi government’s threats in farmers’ agitation
भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आम्ही गदा आणलेली नाही. उलट जॅक डोर्सी ट्विटर सीईओ असताना त्यांनी भारताचे सार्वभौमत्व मान्य केले नव्हते. भारतीय कायद्यांचे त्यांनी वारंवार उल्लंघन केले. याचे अनेक उदाहरणे सरकारकडे पुराव्यांसह उपलब्ध आहेत. भारतीय कायद्यांपेक्षा ट्विटर कंपनी स्वतःला वरच्या दर्जाची समजत होती.
"This is an outright lie by Jack Dorsey – perhaps an attempt to brush out that very dubious period of twitters history. Twitter under Dorsey & his team were in repeated & continuous violations of Indian law. As a matter of fact, they were in non-compliance with law repeatedly… pic.twitter.com/UrvrYyvkqV — ANI (@ANI) June 13, 2023
"This is an outright lie by Jack Dorsey – perhaps an attempt to brush out that very dubious period of twitters history. Twitter under Dorsey & his team were in repeated & continuous violations of Indian law. As a matter of fact, they were in non-compliance with law repeatedly… pic.twitter.com/UrvrYyvkqV
— ANI (@ANI) June 13, 2023
शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विटरने अनेक फेक न्युज पसरवल्या. भारतात नरसंहार होत असल्याच्या खोट्या बातम्या व्हायरल केल्या. ट्विटरचा हा काळा इतिहास विसरता येणार नाही. पण त्याच्यावरच रंग सफेदी करण्यासाठी आता जॅक डॉर्सी मोदी सरकारने धमक्या दिल्याच्या अफवा पसरवतो आहे, अशा परखड शब्दांमध्ये राजीव चंद्रशेखर यांनी समाचार घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App