ट्विन टॉवर सुपरटेकचे मालक आरके आरोरा यांना ‘ईडी’कडून अटक; तीन दिवसांपासून सुरू होती चौकशी!

ARORA ED

नोएडामधील ट्विन टॉवर्स मागील वर्षी ऑगस्टमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले होते.

विशेष प्रतिनिधी

नोएडा :  अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी बांधकाम कंपनी सुपरटेकचे मालक आरके अरोरा यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. एजन्सी गेल्या तीन दिवसांपासून अरोरा यांची चौकशी करत होती. यानंतर मंगळवारी त्याला केंद्रीय यंत्रणेने ताब्यात घेतले. सुपरटेक ही तीच कंपनी आहे ज्याने नोएडामध्ये ट्विन टॉवर्स बांधले होते, जे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये उद्ध्वस्त झाले होते. Twin Tower Supertech owner RK Arora arrested by ED

मनी लाँड्रिंग प्रकरणात सुपरटेक कंपनीचे मालक आरके अरोरा यांची ईडी तीन दिवस चौकशी करत होती. या संदर्भात अरोरा यांना मंगळवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या दिल्लीतील कार्यालयातून अटक करण्यात आली. अरोरा यांच्या कुटुंबीयांना ईडीने संध्याकाळी उशिरा त्यांच्या अटकेची माहिती दिली.

ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) अरोरा यांना अटक केली आहे. एजन्सी आज अरोरा यांना विशेष न्यायालयात हजर करून त्यांची कोठडी मागण्याची शक्यता आहे.

दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुपरटेक समूहाविरुद्ध अनेक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या आधारावर ईडीने सुपरटेक समूह, त्याचे संचालक आणि प्रवर्तकांवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. एप्रिलमध्ये, ईडीने सुपरटेक आणि त्याच्या संचालकांची 40 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

Twin Tower Supertech owner RK Arora arrested by ED

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात