विशेष प्रतिनिधी
चेन्नई : तमिळ सुपरस्टार विजय याने जाळीदार टोपी घातली. इफ्तार पार्टी केली. पण तामिळनाडू सुन्नत जमात या संघटनेने ती त्याच्याच अंगलट आणली.
त्याचे झाले असे :
तमिळ सुपरस्टार विजय याने आपले राजकीय भवितव्य आजमावून पाहण्यासाठी तमिळगा वेत्री कळघम अर्थात TVK नावाचा पक्ष काढला. त्या पक्षाची दोन अधिवेशने घेतली. त्या अधिवेशनांचा प्रतिसाद त्याला सुखावणारा ठरला. त्या पाठोपाठ विजय याने तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांना जायला सुरुवात केली. काही कार्यक्रम आयोजित देखील केले. लवकरच विजयचा जननायकन हा सिनेमा रिलीज होणार असून त्याद्वारे तामिळनाडूच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारण्याचा विजयचा इरादा आहे.
या पार्श्वभूमीवर तमिळनाडूतील मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी विजय याने दोनच दिवसांपूर्वी भली मोठी इफ्तार पार्टी दिली. त्यावेळी त्याने डोक्यावर जाळीदार टोपी घातली. नमाज अदायगीत सहभाग घेतला. या स्टार पार्टीचे फोटो सगळीकडे जोरदार व्हायरल झाले, पण आता हीच इफ्तार पार्टी विजय याच्या अंगलट आली. कारण तमिळनाडू सुन्नत जमात या संघटनेने विजय याच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. विजय याने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीमध्ये मुसलमानांचा अपमान झाला. त्या पार्टीमध्ये रोजा अर्थात उपवास धरणारे मुसलमान सहभागी झाले नव्हते, तर रस्त्यावर हुल्लडबाजी करणारे गुंड आणि मवाली त्यात सामील झाले होते, असा आरोप तमिळनाडू सुन्नत जमात या संघटनेचे कोषाध्यक्ष सय्यद कौस यांनी केला.
विजयने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत मुस्लिमांना वाईट वागणूक मिळाली. त्यांचा अपमान झाला, तरी देखील विजय याने त्याबद्दल कुठला खेद प्रगट केला नाही, असेही सय्यद कौस म्हणाले. मात्र त्याचवेळी केवळ प्रसिद्धीसाठी विजय याचा इफ्तार पार्टी विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नसल्याचा दावाही त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App