लव्ह जिहाद : शीजानने तुनिषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, वापरले आणि फसवले; आईचा गंभीर आरोप 

प्रतिनिधी

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा तिच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण लव्ह जिहादच्या वळणावर गेले आहे. कारण तिच्या आईने शीजान मोहम्मद खान याच्यावर तुनिषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवल्याचा आरोप केला आहे. मीडियाच्या नावाने संबोधित करतानाचा व्हिडिओ तुनिषाच्या आईने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल देखील झाला आहे. Tunisha is lured, used and deceived by Sheejan

त्यामध्ये तुनीषाची आईने आरोपी शीजान मोहम्मद खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.


लव्ह जिहाद : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अभिनेता शीजान खानला अटक


  • काय म्हणाली तुनिषाची आई? 

शीजानने तुनिषाला धोका दिला. तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आला. लग्नाचे वचन देऊन नंतर तिच्यासोबत ब्रेकअप केले. दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशीप मध्ये असतानाही त्याने तुनिषासोबत संबंंध ठेवले. तिचा वापर केला. शीजानला शिक्षा झालीच पाहिजे. त्याच्यामुळे मी माझी मुलगी गमावली आहे. मीडिया आम्हाला खूप सपोर्ट करत आहे. त्यांंचेही धन्यवाद.

या प्रकरणात तुनिषाच्या आईने जरी थेट लव जिहाद हे शब्द उच्चारले नसले तरी आज तकने दिलेल्या बातमी तुनिषाच्या सुसाईड नोटमध्ये काही विशिष्ट गोष्टी असल्याचे म्हटले आहे. लग्नापूर्वी शीजान तुनिषाचे धर्मांतर करू इच्छित होता, असे तिच्या सुसाईड नोटमध्ये असल्याचे बातमीत म्हटले आहे.

  • काय आहे प्रकरण? 

शीजान आणि तुनिषा काही काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. तुनिषाच्या मृत्यूआधी काही दिवस त्यांचे ब्रेकअप झाले होते. यामुळे ती तणावात होती. याच तणावातून अभिनेत्रीने हे टोकाचे पाऊल उचलले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधूनही कुठलीही बळजबरी झाल्याची चिन्ह दिसत नाही. पोलीस याप्रकरणी आणखी माहितीचा शोध घेत आहेत. तुनिषा शर्माने 2013 मध्ये प्रीमियर झालेल्या भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप या चित्रपटातील भूमिकेने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक टीव्ही शोमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, तिने फितूर, बार बार देखो आणि कहानी 2 या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

  • हे प्रकरण लव्ह जिहादचे

भाजप नेते गिरिश महाजन यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दिवसेंदिवस लव्ह जिहादची प्रकरणे वाढतच आहेत आणि आम्ही या विरोधात कडक कायदा आणण्याचा विचार करत आहोत.

Tunisha is lured, used and deceived by Sheejan

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात