आशियामधील सर्वाट मोठे ट्यूलिप नंदनवन म्हणून मिळाला मान
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : झाबरवान पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डनने आज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) मध्ये प्रतिष्ठित स्थान मिळवले आहे. या प्रतिष्ठित ओळखीने या बागेला आशियातील सर्वात मोठे ट्यूलिप नंदनवन म्हणून स्थान दिले आहे, ज्यामध्ये 1.5 दशलक्ष ट्यूलिपची सुंदर फुलं आहेत, जे 68 भिन्न नेत्रदिपक ट्यूलिप प्रजातींचे चित्र दर्शवतात प्रतिनिधित्व करतात. Tulip Garden in Srinagar got a place in the World Book of Records
ट्यूलिप गार्डन येथे आज झालेल्या औपचारिक समारंभात फ्लोरिकल्चर, गार्डन्स आणि पार्क्सचे आयुक्त सचिव शेख फयाज अहमद यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) चे अध्यक्ष आणि सीईओ संतोष शुक्ला यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
दिलीप एन पंडित, संपादक, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन), संचालक फ्लोरिकल्चर काश्मीर, इतर अधिकारी आणि फलोत्पादन कर्मचारी देखील यावेळी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App