प्रतिनिधी
पुणे : जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग स्वातंत्र्य लढ्यात देखील मोठे प्रेरणास्त्रोत होते छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर सावरकर यांच्यासारख्या महान योद्ध्यांना यांनी प्रेरणा दिली, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काढले. Tukaram Maharaj’s source of inspiration for unbroken freedom; Glorious mention of Chhatrapati Shivaji Maharaj and Veer Savarkar by Prime Minister Modi
स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचे प्रेरणास्रोत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांनी ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. अत्यंत वेदनादायीस्थितीत ते अंदमानात शिक्षा भोगत होते. याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वातंत्र्य लढ्यात कारागृहात शिक्षा भोगत असताना वीर सावरकर यांनी चिपळ्यासारख्या हातकड्या वाजवत संत तुकारामांचे अभंग गायले होते’, असे म्हटले. पुण्याजवळील देहू येथे १७व्या शतकातील संत तुकाराम महाराज मंदिरात शिळा मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर वारकरी बांधवांच्या मेळाव्याला ते संबोधित करत होते.
अभी कुछ महीनें पहले ही मुझे पालकी मार्ग में 2 राष्ट्रीय राजमार्ग को फोरलेन करने के लिए शिलान्यास का अवसर मिला था। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग का निर्माण 5 चरणों में होगा और संत तुकाराम पालकी मार्ग का निर्माण 3 चरणों में पूरा किया जाएगा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/RNTOdky942 — ANI_HindiNews (@AHindinews) June 14, 2022
अभी कुछ महीनें पहले ही मुझे पालकी मार्ग में 2 राष्ट्रीय राजमार्ग को फोरलेन करने के लिए शिलान्यास का अवसर मिला था। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालकी मार्ग का निर्माण 5 चरणों में होगा और संत तुकाराम पालकी मार्ग का निर्माण 3 चरणों में पूरा किया जाएगा: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी pic.twitter.com/RNTOdky942
— ANI_HindiNews (@AHindinews) June 14, 2022
शिवरायांच्या जीवनात संत तुकारामांची भूमिका महत्वाची
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातही संत तुकाराम महाराज यांनी मोठी भूमिका निभावली आहे. विविध कालखंडात संत तुकाराम महाराज यांचे विचार प्रेरणादायी ठरले. पंढरपूरची वारी, ओडीसातील भगवान जगन्नाथाची यात्रा, चारधाम यात्रा या सर्व सामाजिक आणि अध्यात्मिक गतिशीलतचे दर्शक आहेत. देशभरात होणाऱ्या यात्रा देशाला ऊर्जा देतात, या माध्यमातून भारताला संघटित ठेवले आहे. देशाच्या विविधतेला जोडले आहे. प्राचीन ओळख परंपरा सुरक्षित ठेवण्याचे आपले कर्तव्य आहे. आज पंढरपूर पालखी मार्गाचे आधुनिकीकरण होत आहे, अयोध्येत भव्य राम मंदिर होत आहे, विकास होत आहे. ८ वर्षांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पंच तीर्थांचा विकास होत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन होणार आहे, हीदेखील आपल्या संतांचीच कृपा आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App