नाशिक : भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% टेरिफ लादायची हिमाकत केली. चीनवर दादागिरी करता येत नाही म्हणून त्यांनी भारतावर दादागिरी करून पाहिली. पण भारताने त्यांना ताबडतोब जसेच्या तसे प्रत्युत्तर दिले. ट्रम्प यांनी भारतावर लादलेले 50 % tariff अन्याय्य आहेत. ते समर्थनीय नाहीत. भारत स्वतःचे हित जपल्याशिवाय राहणार नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट केले.
पण चीन, भारत किंवा अन्य देशांवर टेरिफ लादायची घोषणा स्वतः डोनाल्ड ट्रम्प करतात, पण त्यांना उत्तरे मात्र चीन आणि भारत त्याचबरोबर अन्य देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते देतात. यातच बरेच काही between the lines आले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलचे अध्यक्ष लुला यांना आपल्याला फोन करायला सांगितले होते. त्यावर अध्यक्ष लुला यांनी आपण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करू, पण दादागिरी करणाऱ्या ट्रम्प यांना फोन करणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. अमेरिकेच्या अध्यक्षांनी कुठले वक्तव्य केले आणि त्याला अन्य देशांच्या कुठल्याही नेत्यांनी थेट त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले, असे डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधी फारसे घडले नव्हते. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय संकेत आणि सभ्यता झुगारून आंतरराष्ट्रीय संबंधांची भाषा दादागिरीची वापरायला सुरुवात केल्यानंतर बाकीच्या देशांनी ट्रम्प यांचा मुलाहिजा बाळगणे सोडून दिले. लुला यांनी जाहीरपणे नाव घेऊन हे स्पष्ट दाखवून दिले.
पण त्या पलीकडे जाऊन भारताने ट्रम्प यांना राजनैतिक भाषेत जे प्रत्युत्तर दिले, त्याला विशेष महत्त्व आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी 25% टेरिफ लादावा, 50 % टेरिफला लादावा, भारत स्वतःचे हित जपल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट सांगून भारताने ट्रम्प यांच्या 50% टेरिफ मधली हवा तीन वाक्यांमध्ये काढून घेतली.
It is extremely unfortunate that the US chose to impose additional tariffs on India for actions that several other countries are also taking in their own national interest. We reiterate that these actions are unfair, unjustified and unreasonable. India will take all actions… pic.twitter.com/ecYdZqwyx4 — ANI (@ANI) August 6, 2025
It is extremely unfortunate that the US chose to impose additional tariffs on India for actions that several other countries are also taking in their own national interest. We reiterate that these actions are unfair, unjustified and unreasonable. India will take all actions… pic.twitter.com/ecYdZqwyx4
— ANI (@ANI) August 6, 2025
– मोदींचा जपान + चीन दौरा
डोनाल्ड ट्रम्प यांनी लागलेले 50% टेरिफ 17 सप्टेंबर पासून लागू होणार आहे, पण त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असा दौरा असणार आहे. चीन मध्ये ते शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात मोदी चीन आणि जपान यांच्यातले हवामान, सांस्कृतिक संबंध वगैरेच्या बाष्कळ गप्पा मारणार नाहीत, तर थेट व्यापारी गप्पा मारतील. अमेरिकेने भारतावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला, तर भारत आंतरराष्ट्रीय व्यापाराचा कसा पर्याय शोधू शकतो, हे दाखवून देतील.
– ट्रम्प आणि संजय राऊत
ट्रम्प जसे रोज संजय राऊत यांच्यासारखे समोर येऊन पत्रकारांशी बोलतात, तसे मोदी, शी जिनपिंग किंवा जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा पत्रकारांसमोर येऊन बोलणार नाहीत. हे तिन्ही नेते स्वतःचा डोनाल्ड ट्रम्प रुपी संजय राऊत करून घेणार नाहीत. पण म्हणून ते “शांत” देखील बसणार नाहीत. उलट अमेरिकेच्या व्यापारी दादागिरीला चोख प्रत्युत्तर द्यायचे, उपाय शोधून काढतील. त्यानंतर भारत, चीन आणि जपान हे तिन्ही देश आंतरराष्ट्रीय व्यापारा संदर्भात ज्या कार्यवाही करतील, त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे भारताच्या विरुद्धचे टेरिफ युद्ध पुढे रेटू शकतील का??, याविषयी दाट शंका आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App