Understand Geo politics : भारताने न मागताच ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी; भारत – पाकिस्तान यांना बरोबरीचे ठरवून करणार व्यापारवृद्धी!!

नाशिक : भारत आणि पाकिस्तान यांच्यात तथाकथित “शस्त्रसंधी” झाल्यानंतर पाकिस्तानी ती फक्त तीन तासांमध्ये तोडली भारतावर ड्रोन हल्ले केले. जम्मूच्या आर. एस. पुरा भागात तो गोळ्यांचे मारे करून बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानांना शहीद केले. पण काल रात्री जे घडले, ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज कानाआड केले. भारताने मागणी केली नसताना ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करायची तयारी दाखवली. त्याचवेळी भारत आणि पाकिस्तान यांना एकाच तागडी तोलून दोन्ही देशांची व्यापार वाढवायची लालूच देखील दाखवली. यामागे अमेरिकेचे मोठे धोरणात्मक Geo politics दडले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेपेक्षा अमेरिकेला स्वतःच्या व्यापार वाढवायची चिंता पडली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रू सोशल मीडिया हँडलवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना “महान राष्ट्रे” असे संबोधले. दोन्ही महान राष्ट्रांच्या महान नेतृत्वांशी मी चर्चा केली. दोन्ही नेतृत्वांनी शस्त्रसंधी स्वीकारण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. हा विषय चर्चेत नसताना देखील मी या दोन्ही महान देशांशी मोठ्या प्रमाणावर व्यापार वाढविण्याचा निर्णय जाहीर करतो. 1000 वर्ष जुन्या काश्मीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी अमेरिका दोन्ही देशांबरोबर चर्चा करेल, असे लिहिले.

– पाकिस्तान तर “शिखंडी”

या सगळ्या मशक्कतीतून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांच्या अँगलमधून चीनला काटशह द्यायचा प्रयत्न केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या संघर्षात पाकिस्तान दुय्यम असून पाकिस्तानला “शिखंडी” करून चीनच खरा भारताशी लढतोय. भारताला पाकिस्तान बरोबरच्या संघर्षात engage ठेवून गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा वाढलेला “दबदबा” खाली आणायचा प्रयत्न करतोय आणि त्याचवेळी दक्षिण आशिया भागात विशेषतः पाकिस्तानात अमेरिकेची भूमिका “दुय्यम” ठरवतेय हे लक्षात घेऊनच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी केली. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये कॉन्फरन्स कॉल घडवून त्यांना शस्त्रसंधी स्वीकारायला लावली. पण पाकिस्तानने अवघ्या तीन तासांमध्ये ती शस्त्रसंधी धुडकवली, तरी त्याकडे दुर्लक्ष करून भारत आणि पाकिस्तान यांच्याबरोबर व्यापार वाढविण्याची लालूच दाखविली. त्यानिमित्ताने भारताने मागणी केलेली नसताना किंबहुना भारताचा विरोध असताना काश्मीर प्रश्नी अमेरिका, भारत आणि पाकिस्तान अशी त्रिपक्षीय वाटाघाटी सुरू करायची ऑफर दिली. त्यातून चीनला अप्रत्यक्षपणे वगळले.

भारत – अमेरिका व्यापार करार, चीनला काटशह

पण त्या पलीकडे जाऊन देखील ट्रम्प यांच्या या लुडबुडीला विशेष अर्थ आहे, तो म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातला थेट व्यापार करार आता अवघ्या काही महिन्यांमध्ये होणार आहे. त्याच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्यात. दोन्ही देश एकमेकांना भरघोस टेरिफ सवलती देण्याच्या बेतात आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधला व्यापार खरंच खूप वाढणार आहे. भारताबरोबर थेट व्यापार करार करून अमेरिकेला चीनला टेरिफ युद्धात हरवायचे आहे. अमेरिकेचा पाकिस्तान बरोबरचा व्यापार एवढा मोठा नाही. कारण पाकिस्तानातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या वस्तूंची संख्या फारशी नाही. तरी देखील पाकिस्तानचे शेपूट व्यापारवृद्धीत जोडून चीन आणि पाकिस्तान यांच्यातील मधुर संबंधांमध्ये “मेख” मारून ठेवता आली तर ती अमेरिकेला हवी आहे म्हणूनच भारताबरोबर पाकिस्तानलाही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारवृद्धीची लालूच दाखविली आहे.

Trump offers third party mediation on Kashmir, understand US Geo politics

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात