ट्रम्पच्या सल्लागाराची भारताला पुन्हा दमबाजी; तर भारताला खते, दुर्मिळ खनिजे आणि बोअरिंग मशिन्स पुरवायची चीनची तयारी; याचा नेमका अर्थ काय??

नाशिक : जगातली 6 मोठी युद्धे थांबवल्याच्या बाता मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीय सल्लागाराने भारताला अमेरिकेशी करायच्या वर्तणुकीबाबत दमबाजी केली, तर दुसरीकडे चीनने भारताला गरजेनुसार खते, दुर्मिळ खनिजे (rare earth minerals) आणि बोअरिंग मशिन्स पुरवायची तयारी दाखवली. जागतिक राजकारणातल्या महत्त्वाच्या शक्तीं मध्ये तणातणी सुरू असताना काल एकाच दिवशी या दोन घटना घडल्या.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युरोपियन युनियन, नाटो संघटना आणि युरोपीय महत्त्वाचे देश जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, इटली, फिनलंड या देशांच्या अध्यक्ष आणि पंतप्रधानांची संयुक्त बैठक घेतली. तिला युक्रेनचे अध्यक्ष व्लादीमिर झेलेन्स्की यांना हजर ठेवले. बैठकीतल्या सगळ्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे शांततेची गॅरंटी मागितली. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना फोन करून अमेरिका + युक्रेन + रशिया त्रिपक्षीय चर्चा सुरू करायची विनंती केली.

– ट्रम्पच्या सल्लागाराची दमबाजी

या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नॅवेरो यांनी भारतालाच राजकीय वर्तणूक सुधारण्याची दमबाजी केली. भारत रशियाकडून तेल खरेदी करून रशियाला हवे असलेले डॉलर्स त्याला देतोय. भारत रशिया आणि चीनकडे झुकलाय. ते त्याने थांबवावे. भारत अमेरिकेचा strategic partner आहे त्याने तशी वर्तणूक ठेवावी, अशा शब्दांमध्ये पीटर नॅवेरो यांनी भारतालाच दमबाजी केली. भारत आपल्या वस्तू अमेरिकेला विकतो. त्यावर जास्त टेरिफ लावतो. त्यामुळे त्या वस्तू महाग मिळतात तरी देखील अमेरिकन लोक त्या विकत घेतात. त्यातून भारत भरपूर डॉलर्स कमावतो आणि त्या डॉलर्स मधून रशियन तेल विकत घेतो, असा राहुल गांधींसारखा अजब युक्तिवाद पीटर नॅवेरो यांनी केला.

रशिया भारताला स्वस्तात तेल देतो. त्यामुळे जागतिक स्थिर परिस्थितीत भारतात तेलचे दर स्थिर राहतात. भारतीय नागरिकांवर महागाईचा बोजा पडत नाही. अमेरिकेने किंवा अन्य देशांनी स्वस्तात तेल दिले, भारत त्यांच्याकडूनही ते खरेदी करू शकेल, अशी भूमिका भारताने घेतली. पण पीटर नॅवेरो यांनी ती अमान्य केली. त्याचबरोबर ट्रम्प यांच्या नित्याच्या बडबडीला देखील प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ट्रम्प प्रशासन भारतावर चिडले. त्यातूनच पीटर नॅवेरो यांची दमबाजी बाहेर आली.

पण त्याच वेळी चीन आणि युरोपियन युनियन मधले देश त्याच रशियाकडून तेल विकत घेतात त्यावर पीटर नॅवेरो यांनी चकार शब्द बाहेर लिहिला नाही.



– चीनची तयारी

पण एकीकडे पीटर नॅवेरो असली दमबाजी करत असताना दुसरीकडे चीनने भारताला गरजेनुसार खते, दुर्मिळ खनिजे आणि बोअरिंग मशिन्स पुरवायची तयारी दाखवली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात काल झालेल्या वाटाघाटी मध्ये या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झाले. भारत तैवान संदर्भातली भूमिका बदलणार नाही. तैवानशी राजनैतिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध कायम ठेवेल. त्याचबरोबर चीनशी असलेल्या मतभेदांचे रूपांतर वैरामध्ये करणार नाही, असे जयशंकर यांनी वांग यांना सांगितले. भारत आणि चीन यांनी एकमेकांचे पार्टनर असल्यासारखे वागावे, अशी सूचना वांग यांनी केली. वांग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

चीन मधल्या प्रचंड उत्पादनाला जागतिक बाजारपेठ कमी पडली. त्यात अमेरिकन निर्बंधांची भीती उभी राहिली. चिनी माल त्या देशातच पडून राहण्याचा धोका निर्माण झाला. सप्लाय चीन खंडित व्हायची शक्यता निर्माण झाली. चिनी मालाचे कारखाने बंद पडायची वेळ येऊन ठेपली. त्यामुळे चीन सारख्या अहंकारी देशाला भारताकडे वळावे लागले हेच चीनच्या भारताकडे मर्यादेने झुकण्याचे खरे रहस्य आहे.

भारत आणि चीन यांच्यातल्या सीमा वादाचा मुद्दा दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांच्या चर्चेत समोर आला नाही. तो भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांच्या समकक्ष चिनी अधिकाऱ्यांबरोबरच्या चर्चेत समोर येणार आहे. पण तिथेही मतभेदाचे रूपांतर वैरात न करण्याचे दोघांचेही धोरण असणार आहे.

– नेमका अर्थ असा की…

या सगळ्याचा अर्थ असा की एकीकडे अमेरिका जगाचा पोलीस असल्यासारखी वर्तणूक ठेवते. इतर देश युद्ध करतात आणि अमेरिका ते युद्ध थांबवते, अशी अहंकारी भूमिका घेते. त्याचवेळी भारतासारख्या आपल्या मित्र देशाला दमबाजी करते, पण भारत आणि चीन यांच्यासारखे गंभीर मतभेद असणारे दोन मोठे देश मात्र जागतिक अस्थिर वातावरणात सामंजस्याची भूमिका घेऊन राजकीय प्रगल्भतेने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत हेच यातून स्पष्ट होते.

Trump aide threatened India again, but China ready to supply according to Indian needs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात