गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींकडे मागितली अटक करण्याची परवानगी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Satyendra Jain आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जैन यांना अटक करण्याची मागणी केली आहे. गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींना भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNS), २०२३ च्या कलम २१८ अंतर्गत जैन यांच्याविरोधात न्यायालयात खटला चालवण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे.Satyendra Jain
गृह मंत्रालयाने अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) मिळालेल्या माहितीच्या आधारे सत्येंद्र कुमार जैन यांच्यावर खटला चालवण्यासाठी परवानगी देण्याची राष्ट्रपतींकडे विनंती केली आहे.
कथित हवाला व्यवहारांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने जैन यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि ३० मे २०२२ रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. सध्या, अंमलबजावणी संचालनालयाने जैन यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App