वृत्तसंस्था
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे अधिकृत ट्विटर अकाउंट मंगळवारी हॅक करण्यात आले. हॅकरने टीएमसीच्या ट्विटर अकाउंटचे प्रोफाइल पिक्चर आणि नाव बदलले. ट्विटर हँडलचे नाव बदलून ‘युग लॅब्स’ असे ठेवण्यात आले.Trinamool Congress official Twitter account hacked, name and profile photo changed
युग लॅब ही अमेरिकेतील ब्लॉकचेन तंत्रज्ञान कंपनी आहे जी NFTs आणि डिजिटल संग्रहण विकसित करते. ही अशी कंपनी आहे, जी क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल मीडियामध्ये तज्ज्ञ आहे.
याआधीही अनेक पक्षांचे ट्विटर हँडल हॅक झाले आहेत. गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी वायएसआर काँग्रेसचे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. या खात्यावर क्रिप्टो करन्सीच्या बाजूने ट्विट करण्यात आले होते. पक्षाच्या ट्विटर बायोमध्येही बदल करण्यात आला होता.
ऑक्टोबरमध्ये तेलुगु देसम पक्षाचे अधिकृत ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आले होते. एप्रिल 2022 मध्ये, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक झाले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App