विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) राज्यसभा सदस्य डेरेक ओ ब्रायन यांना हिवाळी अधिवेशनाच्या राहिलेल्या दिवसांसाठी मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे. इलेक्टोरल रोल विधेयकावरील चर्चेत नियमांचे पुस्तक सभापतींच्या टेबलच्या दिशेने फेकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.Trinamool Congress leader Derek O’Brien suspended, begging for rules
सभागृहातील गदारोळाचा हवाला देऊन सभापतींनी मतदानाची अनुमती दिली नव्हती, तेव्हा ओ ब्रायन यांनी तसे केले. यानंतर विरोधी नेत्यांनी सभात्याग केला. सरकारने डेरेक ओ ब्रायन यांच्या वर्तनावर आक्षेप घेतला गेला आणि त्यांच्या निलंबनाची मागणी केली गेली.
ब्रायन यांना अधिवेशनाच्या राहिलेल्या दिवसांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला गेला. आक्षेपार्ह वर्तनासाठी त्यांना निलंबित केले गेले.डेरेक ओ ब्रायन यांनी निलंबन हा सरकारचा कट असल्याचे म्हटले. ते म्हणाले, निवडणूक सुधारणा कायद्यासाठी बहुमत निर्माण करण्यासाठी विरोधी पक्षाच्या सदस्यांना निलंबित केले गेले.
आशा आहे की, कृषी कायद्यांप्रमाणे हे विधेयकही सरकारला लवकरच परत घ्यावे लागेल. हे विधेयक संसदेच्या निवड समितीकडे पाठवण्यासाठी राज्यसभा सदस्यांना पुरेसा वेळ दिला गेला नाही, असा आक्षेप ओ ब्रायन यांनी हे विधेयक मांडले जात असताना घेतला होता. हा आक्षेप उपसभापती हरिवंश यांनी फेटाळला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App