काही लोकांसाठी गाय “गुन्हा” असेल, पण आमच्यासाठी गाय ही माताच; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नि;संदिग्ध प्रतिपादन

वृत्तसंस्था

वाराणसी : या देशात काही लोकांनी असे वातावरण निर्माण केले आहे, की गाय, गोवंश आणि गोबरधन या विषयी बोलणे म्हणजे आपण काहीतरी गुन्हाच करतो आहोत, असे त्यांना वाटते. त्या लोकांसाठी गाय हा “गुन्हा” असेल, पण आमच्यासाठी गाय ही माताच आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत केले.Trinamool Congress – Collaboration between Prashant Kishor, yet wide political gap

वाराणसीच्या दौऱ्यात पंतप्रधानांनी बनास डेअरी प्रकल्पासह अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटने केली. सुमारे 837 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची ही काम मोदींनी देशाला समर्पित केली आहेत. यावेळी झालेल्या शेतकरी मेळाव्याला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले.



मोदी म्हणाले, की या देशात काही लोकांनी असे वातावरण निर्माण केले आहे की गाय, गोवंश किंवा गोबरधन या विषयी बोलणे म्हणजे आपण काहीतरी गुन्हा करतो आहोत असे मानणे होय. परंतु गाय ही आमच्यासाठी माताच आहे. गोधन आणि गोवंश यांची खिल्ली उडवणाऱ्या लोकांना हे माहिती नाही, की या गोवंश आणि पशुधन यामुळेच देशातल्या तब्बल 8 कोटी परिवारांची उपजीविका चालते.

देशातले दूध उत्पादन संपूर्ण जगाच्या 22% आहे आणि ते भरपूर वाढविण्याची क्षमता देशाच्या गोधनामध्ये, पशुधनामध्ये आणि आपल्या शेतकरी बांधवांमध्ये आहे. एकेकाळी शेतकऱ्याच्या गोठ्या मध्ये किती गाई आहेत?, किती पशुधन आहे?, यावर श्रीमंती ठरायची. परंतु आता काही लोकांनी गाय आणि गोवंश यांची खिल्ली उडवून विचित्र वातावरण तयार केले आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

त्याच वेळी पंतप्रधान मोदींनी पूर्वांचल विकासाच्या योजना संदर्भात सविस्तर वर्णन केले. पूर्वांचल मध्ये शेतकरी विकासाच्या असंख्य संभावना असताना काही लोकांनी फक्त जात – धर्म याच चष्म्यातून पूर्वांचलाच्या राजकारणाकडे पाहिले. यांनी जातीजातींमध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजली.

त्यांना फक्त माफियावाद आणि परिवारवाद हे दोन शब्द लागू होतात. विकास आणि विकासाची दृष्टी या दोन्हींशी त्यांचा काहीही संबंध नाही. सामान्य माणूस त्यांच्या राजकारणाच्या कक्षेतही येत नाही, असा घणाघाती हल्लाबोल मोदींनी गांधी परिवार आणि मुलायमसिंग यादव परिवारांवर केला.

पूर्वांचलात योगी सरकारने कायद्याचा बडगा चालवून माफियागिरी मोडीत काढली आहे. “माफियांचे राज्य” ही पूर्वांचलाची ओळख योगींनी गेल्या पाच वर्षात पुसून टाकली आहे.

पंतप्रधान मोदी यांचा हा वाराणसीचा दुबार दौरा होता. काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनानंतर काशीमध्ये संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम होत आहेत. त्यापैकी आजचा शेतकरी मेळावा आणि विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणी आणि उद्घाटनाचा कार्यक्रम हा महत्त्वाचा उपक्रम होता.

Trinamool Congress – Collaboration between Prashant Kishor, yet wide political gap

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात