विशेष प्रतिनिधी
कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांना विजयासाठी मदत करणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात दरी रुंदावली आहे. तृणमूल काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांची आय पॅक या संस्थेमध्ये कोलॅबरेशन जरूर आहे, परंतु ते मर्यादित स्वरूपाचे आहे. तृणमूल काँग्रेसला ठरवण्यासाठी मदत करणे, त्यासाठी जमिनी स्तरावर काम करून इनपुट घेणे आणि पक्षाच्या नेत्यांना देणे वगैरे कामे आहेत.Trinamool Congress – Collaboration between Prashant Kishor, yet wide political gap
याखेरीज तृणमूल काँग्रेस स्वतःची रणनीती ठरवायला मोकळी आहे. तृणमूल काँग्रेस पक्षसंघटनेत 21 जणांची राष्ट्रीय कार्यकारणी आहे. ही राष्ट्रीय कार्यकारणी स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकते, अशी माहिती राज्यसभेचे निलंबित खासदार डेरेक ओब्रायन यांनी दिली आहे.
तृणमूल काँग्रेस आणि प्रशांत किशोर यांच्या मध्ये नेमके कोणते आणि कसे संबंध आहेत?, या विषयीचे विवेचन त्यांनी केले आहे प्रशांत किशोर यांच्या आय पॅक संस्थेशी पाच वर्षांचा तृणमूल काँग्रेसचा करार आहे. त्यानुसार काम सुरू आहे. परंतु एक राजकीय पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेसचे कार्यकारणी निर्णय घेते आणि आता तृणमूल काँग्रेसच्या घटनेमध्ये बदल करून पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना “व्हेटो पाॅवर” देण्याचेही घाटत आहे.
पक्षाच्या 21 जणांच्या कार्यकारिणीने एखादा निर्णय घेतला तर त्या निर्णयाला स्थगिती देण्याचा किंवा तो रद्द करण्याचा पूर्ण अधिकार ममता बॅनर्जी यांना या घटना दुरुस्ती करून देण्यात येणार आहे. याचा अर्थ त्या पक्षाच्या अनभिषिक्त सर्वेसर्वा बनणार आहेत.
प्रशांत किशोर यांनी मध्यंतरी काँग्रेसच्या विरोधात जी विधाने केली त्याबद्दल तृणमूल काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेस मधून तृणमूल काँग्रेस मध्ये आलेले नेते गोव्याचे लुईजिनो फालेरो तसेच मेघालयाचे मुकुल संगमा आपल्या तृणमूल काँग्रेस मधील प्रवेशाचे क्रेडिट प्रशांत किशोर यांना दिले होते.
त्याबद्दलही तृणमूळ काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे नाराजी आहे. कोलकत्ता महापालिका निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी जे कोणते राजकीय सल्ले काँग्रेसला दिले होते ते सगळे बाजूला ठेवण्यात आले. ममता बॅनर्जी आणि पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेतले.
थोडक्यात जोपर्यंत प्रशांत किशोर हेवे करून बॅक्रूम बॅक रूम बॉय होते तोपर्यंत तृणमूल काँग्रेस नेत्यांना अडचण नव्हती परंतु त्यांनी आपला तो रोल सोडून पुढाकार घ्यायला सुरुवात केल्यानंतर मात्र तृणमूल काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आणि त्यांनी प्रशांत किशोर यांचे सल्ले बाजूला सारून काम करायला सुरुवात केली.
तृणमूल काँग्रेसचे स्वतःचे विस्तारीकरणाचे प्लॅन्स आहेत. जेथे भाजपशासित राज्यांमध्ये विरोधी पक्ष कमकुवत आहेत तेथेच तृणमूल काँग्रेस जाणार आहे. विस्तार करणार आहे. तामीळनाडूत द्रमुक पक्ष प्रबळ आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रबळ आहेत.
या राज्यांमध्ये तृणमूल काँग्रेस आपला विस्तार करणार नाही. त्यामुळे राजकीय रणनीती ठरवणे हे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या अखत्यारीतच ठेवल्याचे स्पष्ट आहे. खासदार डेरेक ओब्रायन यांच्या सविस्तर स्पष्टीकरणातून हे उघड झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App