कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ceasefire झाल्याचे जाहीर करून अवघे चार तास उलटले नाही, तोच पाकिस्तानने त्या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने जम्मूत केलेल्या गोळीबारात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सचे जवान मोहम्मद इम्तियाज शहीद झाले. पाकिस्तानी वैष्णोदेवी पर्यंत गोळीबार केल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या. Pakistan

भारताने पाकिस्तानच्या शस्त्रसंधीवर विश्वास ठेवला नव्हताच. त्यामुळे भारतीय नेत्यांनी शस्त्रसंधी हा शब्दच वापरला नव्हता. दोन्ही बाजूंनी फक्त फायरिंग थांबवायचे ठरले आहे एवढेच भारतीय नेत्यांनी ट्विट केले होते.

पण पाकिस्तानने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विश्वास तोडला आणि अवघ्या चार तासांमध्ये जम्मू – श्रीनगर परिसरात गोळीबार करून बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या जवानाला शहीद केले.

पाकिस्तानने पठाणकोट, कठूवा, उधमपूर त्याचबरोबर गुजरात मधल्या कच्छ जिल्ह्यात ड्रोन हल्ले केले. भारतीय फौजांनी हे सगळे हल्ले परतवून लावले. भारताने पश्चिम सीमेवरील सगळ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ब्लॅकआऊट जारी केला. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी हे कसले ceasefire??, श्रीनगर मध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले, असे ट्विट केले.

Treacherous Pakistan breaks ceasefire

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात