Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

PM Modi

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापाराचे हत्यार दाखवून मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणुयुद्ध थांबविले, असा आज दावा केला, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे नाव न घेता तो दावा फेटाळून लावला. Trade आणि terrorism एकत्र चालणार नाहीत अशा स्पष्ट शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले Trade and terrorism, blood and water will not flow together; PM Modi warns Pakistan and America too!!

ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातल्या जनतेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी व्यापार आणि दहशतवाद, पाणी आणि रक्त, दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकणार नाहीत. भारत तशा एकत्र चालवू देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये पाकिस्तान आणि जागतिक समुदायाला सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या सैन्य दलांच्या पराक्रमाला सॅल्यूट केला.



ऑपरेशन सिंदूर दरम्यान संपूर्ण जगाने मेड इन इंडिया शस्त्रांची अचूक स्मारक क्षमता अनुभवली. इथून पुढे मेड इन इंडिया शस्त्रांचीच जागतिक पातळीवर चलती असेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले :

– ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तान बरोबरच्या संबंधांमध्ये न्यू नॉर्मल मापदंड सेट केले. पाकिस्तानच्या छातीवर प्रहार केला. भारताने दहशतवादाविरुद्ध युद्ध छेडले होते पण पाकिस्तानने दहशतवादाला थारा देऊन ते युद्ध आपल्यावर उडवून घेतले

– इथून पुढे भारत दहशतवादी आणि दहशतवाद्यांचे आका यांना वेगळी मानणार नाही. भारताने पाकिस्तान विरुद्ध आणि दहशतवादाविरुद्धची लष्करी कारवाई सध्या स्थगित केली आहे पण पाकिस्तानची वर्तणूक तपासूनच यापुढे त्या देशाशी व्यवहार केला जाईल. पाकिस्तानने दहशतवाद पोसलाच, तर पाकिस्तानात कुठेही घुसून त्याला संपविले जाईल हे भारताचे आता इथून पुढचे धोरण असेल.

– सिंधू जल करार स्थगितच राहील. कारण रक्त आणि पाणी एकत्र वाहू देणार नाही. चर्चा आणि दहशतवाद आम्ही एकत्र चालू देणार नाही. दहशतवादाबरोबर व्यापार एकत्र चालू देणार नाही.

– पाकिस्तानशी चर्चा करायचीच तर दहशतवाद संपविण्यासाठी आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर भारताला परत घेण्यासाठीच होईल. अन्य विषयांवर चर्चा होणार नाही.

– पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून पाकिस्तानला उद्देशून गंभीर इशारे दिले असले तरी अमेरिकेने मध्यस्थी केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातले अणुयुद्ध थांबले, हा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा देखील अप्रत्यक्षपणे फेटाळून लावला.

Trade and terrorism, blood and water will not flow together; PM Modi warns Pakistan and America too!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात