विशेष प्रतिनिधी
मुंबई : नोटांचे हार अन् जेसीबी तून फुलांची बौछार, यालाओ म्हणतात टॉयलेट अटॅच्ड बस स्टॉपच्या उद्घाटनाचा थरार!!, हा असला प्रकार अजून तरी महाराष्ट्रात घडल्याचे उघड झालेले नाही, पण तिकडे सुदूर तामिळनाडूत मात्र हा प्रकार कालपरवाच घडला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
त्याचे झाले असे :
तामिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात DMK चे आमदार के. पी. शंकर यांनी आपल्या मतदारसंघात ठिकठिकाणी बस स्टॉप बांधले. त्याला अटॅच्ड टॉयलेट बांधले. त्यापैकी एका बस स्टॉपच्या उद्घाटनाचा दणकेबाज समारंभ त्यांनी घडवून आणला. हा समारंभ एवढा गाजला की त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये ५ – ७ तमिळ सुंदरी लाल साडी नोटांचे हार घेऊन उभ्या असलेल्या दिसल्या.
आमदार के. पी. शंकर उद्घाटनाला येताच या सगळ्या सुंदरींनी त्यांच्या गळ्यात नोटांचे हार घातले. तेवढ्यात फुलांच्या पाकळ्यांनी भरलेला जेसीबी समोर आला. त्याने के. पी. शंकर यांच्या मस्तकावर त्या पाकळ्यांची बौछार केली. ती एवढी जबरदस्त झाली की निम्मे के. पी. शंकर त्यात बुडाले. त्यामुळे कार्यकर्त्यांना शंकर यांच्या पायाभोवतीच्या पाकळ्या हाताने बाजूला कराव्या लागल्या. मग शंकर यांनी एकेक पाय त्या पाकळ्यांमधून बाहेर काढून आपली सुटका करून घेतली. नंतर शंकर यांनी हातात कात्री घेऊन बस स्टॉप आणि टॉयलेटची फीत कापली.
या सगळ्या इव्हेंटचा सोशल मीडियात अनेकांनी जोरदार समाचार घेतला. जेवढा खर्च बस स्टॉप आणि टॉयलेट बांधायला आला, त्यापेक्षा जास्त खर्च शंकर यांनी उद्घाटनावर केला, असे शरसंधान अनेकांनी साधले. पण या सगळ्या इव्हेंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अनेकांची जोरदार करमणूक झाली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App