मुस्लिम हक्कांवर प्रश्न विचारताच मोदींनी अमेरिकन महिला पत्रकाराला सुनावले, सबका साथ सबका विकास सबका विश्वास!!

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका महिला पत्रकाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात सुनावले. Together, for everyone’s growth, with everyone’s trust and everyone’s efforts.

संबंधित महिला अमेरिकन पत्रकाराने तुमचे सरकार मुस्लिमांच्या हक्काविषयी नेमके काय करते?, असा प्रश्न विचारल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले, सबका साथ सबका विकास सबका विश्वास हेच आमच्या सरकारचे धोरण आहे. लोकशाहीमध्ये कोणत्याही प्रकारच्या धर्म, जात, वंश, लिंग, पंथ या भेदभावांना थारा नाही.

भारतात आमचे सरकार राज्यघटनेला अनुसरून चालते. आमच्या पूर्वजांनी भारतातली लोकशाही कुठल्या अन्य देशांकडून दत्तक घेऊन राबवली नाही. ती आमच्या देशाचीच देणगी आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा भारतात लोकशाही आहे असे “म्हणतात” असे शब्द प्रयोग करता, तेव्हा मला आश्चर्य वाटते.

कारण लोकशाही ही भारत आणि अमेरिकेच्या डीएनए मध्ये आहे, असा उल्लेख राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केला आहे, तो योग्यच आहे. त्यासाठी भारताला इतरांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. भारतात लोकशाहीची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत आणि लोकशाहीचा वृक्ष देखील चांगलाच विस्तारला आहे, याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले.

त्याचबरोबर भारतात सरकारी पातळीवरच्या सवलती सोयीसुविधा देण्यात कोणताही भेदभाव केला जात नाही. भारतात प्रत्येक धर्म, वंश, जात, लिंग या आधारे भेदभाव न करता प्रत्येकाला समानतेची वर्तणूक दिली जाते. कायदा सर्वांसाठी समान आहे. सबका साथ सबका विकास सबका विश्वास हेच भारत सरकारचे धोरण आहे, अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान मोदींनी संबंधित अमेरिकन महिला पत्रकाराला सुनावले.

Together, for everyone’s growth, with everyone’s trust and everyone’s efforts.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात