वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध राज्यांमधील प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी – कर्मचारी यांच्याशी संवाद साधत आहेत. यामध्ये स्थानिक पातळीवर शोधलेल्या अनोख्या उपाययोजना केंद्र सरकारला शेअर करायलाही सांगत आहेत. अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी आणि महापालिका आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रात वेगळे प्रयोग केले आहेत. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक उपाययोजनांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडताना दिसत आहे. TN’s taxi ambulance, Rajasthan’s mobile OPD, oxygen nurses of Kerala, among India’s best COVID practices
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी राज्यांच्या आरोग्य मंत्रालयांना ताज्या मार्गदर्शक सूचना अमलात आणण्यासंबंधी पत्र लिहिले आहे. या पत्रात जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पंतप्रधान मोदींबरोबर शेअर केलेल्या काही उपाययोजनांचा समावेश आहे. यामध्ये तामिळनाडूतील टॅक्सी अँब्युलन्स, राजस्थानमधील मोबाईल ओपीडी, केरळमधील ऑक्सिजन नर्स आदी उपक्रमांचा समावेश आहे. हे उपक्रम त्या राज्यांमध्ये यशस्वी झाले असून त्यांचे अनुकरण इतर राज्यांनाही करता येईल, असे पत्रात सूचित करण्यात आले आहे.
राजस्थानात मोबाईल ओपीडीच्या उपक्रमाद्वारे नॉन कोविड पेशंटना सेवा देण्यात येते, तर बिकानेरमध्ये ऑक्सिजन मित्र हा उपक्रम यशस्वी झाला आहे. ऑक्सिजनचा योग्य आणि सुरक्षित वापरावर ऑक्सिजन मित्र भर देतात.
केरळच्या छोट्या आणि मोठ्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन नर्स कार्यरत आहेत. त्या देखील ऑक्सिजनचा योग्य आणि सुरक्षित वापराचा जागीच सल्ला देतात. त्यातून ऑक्सिजनची बचत आणि त्याचा योग्य ठिकाणी उपयोग होताना दिसतो.
Union Health Ministry lists some of innovations & best practices shared by the Districts with PM Modi during interaction on 18th & 20th May with States, District Collectors and Municipal Commissioners on Public Response to COVID Management pic.twitter.com/2Y3Z0IQSJu — ANI (@ANI) May 21, 2021
Union Health Ministry lists some of innovations & best practices shared by the Districts with PM Modi during interaction on 18th & 20th May with States, District Collectors and Municipal Commissioners on Public Response to COVID Management pic.twitter.com/2Y3Z0IQSJu
— ANI (@ANI) May 21, 2021
उत्तर प्रदेशात लसीकरणाच्या रजिस्ट्रेशनसाठी ग्रामीण भागात ७५००० केंद्रे उघडली जातील. ती सगळ्या राज्याचे लसीकरण पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहेत. काशीमध्ये कोविडसंबंधी सगळी माहिती देणारी कोविड रिस्पॉन्स टीम कार्यरत आहे.
TN's taxi ambulance, Rajasthan's mobile OPD, oxygen nurses of Kerala, among India's best COVID practices Read @ANI Story | https://t.co/8rtbNjZThy pic.twitter.com/oydWZilLNG — ANI Digital (@ani_digital) May 21, 2021
TN's taxi ambulance, Rajasthan's mobile OPD, oxygen nurses of Kerala, among India's best COVID practices
Read @ANI Story | https://t.co/8rtbNjZThy pic.twitter.com/oydWZilLNG
— ANI Digital (@ani_digital) May 21, 2021
चंडीगडमध्ये आयुष मंत्रालयाच्या आरोग्य सुविधा आणि आयुष औषधांचे वाटप होते आहे. छत्तीसगडमध्ये जंगीर चंपामध्ये आठवडे बाजारात आयुष काढा देण्यात येतो आहे.
या उपाययोजनांचाही केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पाठविलेल्या पत्रात ठळक उल्लेख आहे. या उपाययोजना अमलात आणायला सोप्या आणि सध्या उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून सर्व राज्ये स्थानिक पातळीवर राबवू शकतात, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App