‘बंगालच्या लोकांना कायम गरिबीत ठेवण्याची तृणमूल काँग्रेसची इच्छा’, मोदींचे टीकास्त्र!

बंगालच्या जनतेचा टीएमसीने विश्वासघात केल्याचा आरोपही मोदींनी केला.


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. शनिवारी, मोदींनी नादिया जिल्ह्यातील कृष्णनगरमध्ये 15,000 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.TMC wants to keep the people of Bengal poor PM Modi said in Krishnanagar



याआधी मोदींनी कृष्णानगरमध्ये रोड शो केला. मोदी शुक्रवारी दुपारी दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आले होते. जिथे त्यांनी हुगळीच्या आरामबागमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. ज्यामध्ये मोदींनी टीएमसी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला. मोदींनी कृष्णानगरमध्ये मोठ्या जनसभेलाही संबोधित केले. यावेळी मोदींनी टीएमसीवर बंगालच्या जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला.

कृष्णानगर प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा वाहतुकीचा वेग वाढेल तेव्हा औद्योगिक उपक्रमही वाढतील. या भागातील शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून, रेल्वे हा पश्चिम बंगालच्या गौरवशाली इतिहासाचा एक भाग आहे. पण स्वातंत्र्यानंतर बंगालला जो ऐतिहासिक फायदा झाला तो नीट पुढे नेला गेला नाही. हेच कारण आहे की सर्व शक्यता असूनही बंगाल मागेच राहिला.

TMC wants to keep the people of Bengal poor PM Modi said in Krishnanagar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात