‘’पंचायत निवडणुकीत ‘टीएमसी’ने खेळला रक्तरंजित खेळ’’ मोदींचा तृणमूलवर हल्लाबोल!


 ‘विरोधकांना मणिपूरच्या वेदना समजल्या नाहीत’ असंही मोदी म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील हावडा येथे आज(शनिवार) भाजपाच्या पंचायती राज परिषदेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्ष आणि ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार निशाणा साधला. पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा संदर्भ देत ते म्हणाले की तृणमूल काँग्रेसने रक्तरंजित खेळ केला आणि पंतप्रधानांनी बूथ कॅप्चरिंगचा आरोपही केला. TMC played a bloody game in Panchayat elections Modi attacked Trinamool

पंचायत निवडणुकीच्या वेळी तृणमूल काँग्रेसवर मतदारांना धमकावल्याचा आणि मतदारांचे  जीवन नरक बनवल्याचा आरोपही केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘जे लोक स्वत:ला लोकशाहीचे चॅम्पियन म्हणून दाखवतात, ते ईव्हीएम काढून टाकण्याचा कट रचत आहेत.’ मोदी म्हणाले की तृणमूलने निवडणुकीच्या वेळी गुंडांना सुपारी दिली होती आणि त्यांना बूथ काबीज करण्यास सांगितले होते.

मणिपूरबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ‘विरोधकांनी मणिपूरचा विश्वासघात केला आहे, त्यांना त्या लोकांच्या वेदना समजत नाहीत आणि त्यांना मणिपूरवर चर्चा करायची नाही’. विरोधक अविश्वास प्रस्तावाला घाबरले होते आणि आम्ही संसदेत अविश्वास प्रस्तावाचा पराभव केला. देशभरात नकारात्मकता पसरवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. विरोधी पक्षाचे सदस्य मतदानाला घाबरत असल्याने ते संसदेतील चर्चा मध्यात सोडून बाहेर पडले असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

TMC played a bloody game in Panchayat elections Modi attacked Trinamool

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात