विशेष प्रतिनिधी
कोलकाता : Amit Shah पश्चिम बंगालमध्ये घुसखाेरांना आश्रय देण्याचे काम तृणमूल काॅंग्रेस करत असल्याचे उघड सत्य आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना जबाबदार धरून . “गृहमंत्री अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवले पाहिजे,” असे वक्तव्य तृणमूल काॅंग्रेसच्या खासदार महुआ माेइत्रा यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झाेड उठली आहे. Amit Shah
बांगलादेशातून होणाऱ्या बेकायदा घुसखोरीबाबत बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर जोरदार टीका केली. “देशाच्या सीमांचे रक्षण करणारा कोणी नाही का? लाखो-कोटींनी घुसखोर भारतात येत आहेत. आपल्या माता-भगिनींवर डोळा ठेवत आहेत, आपली जमीन बळकावत आहेत… अशा वेळी सर्वात आधी अमित शाह यांचे डोके छाटून टेबलावर ठेवले पाहिजे,” असे महुआ मोईत्रा म्हणाल्या. Amit Shah
त्यांनी आरोप केला की गृहमंत्रालय आणि गृहमंत्री आपल्या सीमांचे रक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत. “पंतप्रधान स्वतः सांगतात की परकिये येथे येत आहेत, आपल्या माता-भगिनींवर डोळा ठेवत आहेत. मग या अपयशाची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घ्यावीच लागेल,” असे त्या म्हणाल्या.
यापूर्वीच केंद्र सरकारने रोहिंग्या व बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी ‘ऑपरेशन पुशबॅक’ सुरू केले आहे. मात्र, महुआ मोईत्रा यांनी बीएसएफलाही लक्ष्य केले. “बीएसएफ इथे आहे. मग बीएसएफ काय करत आहे? आम्ही स्थानिक नागरिक मात्र त्यांच्यापासून घाबरून राहतो. प्रत्यक्षात आम्हाला घुसखोरी दिसतच नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
.यासंदर्भात बंगाल भाजपने म्हटले आहे की, “जेव्हा महुआ मोइत्रा गृहमंत्र्यांचे शीर कापण्यासंदर्भात भारष्य करतात, तेव्हा ते टीएमसीची हताशा आणि हिंसेची संस्कृती दर्शवते. ज्यामुळे बंगालची छबी खराब होत आहे आणि राज्याला मागे नेत आहे. ” पक्षाने एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे, ज्यात मोइत्रा पत्रकारांसोबत बोलताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App