विशेष प्रतिनिधी
कोलकता : ‘नारद स्टिंग ऑपरेशन’ भ्रष्टाचारात अटक केलेले तृणमूल काँग्रेसचे चारही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात येणार आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल आणि न्यायाधीश अरजित बॅनर्जी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला आहे.TMC leaders now in home arrest
या प्रकरणाच्या सुनावणीत दोन्ही न्यायाधीशांमध्ये मतभेद दिसून आले. यामुळे नजरकैदेचा मध्यममार्ग न्यायालयाने निवडला.मात्र त्यांना किती दिवस नजरकैदेत ठेवणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.
‘तृणमूल’चे नेते सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा, फिरहाद हकीम आणि सोवेन चॅटर्जी यांनी जामीन देण्यात यावा, असे मत न्या.अरजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले. पण मुख्य न्यायाधीशांचा त्याला विरोध होता.
यामुळे जामिनावरील सुनावणी आता मोठे खंडपीठ करणार असून तोपर्यंत चारही नेत्यांना घरात स्थानबद्धतेत ठेवण्यात येणार आहे.दरम्यान, मुखर्जी, मित्रा आणि चॅटर्जी हे सध्या रुग्णालयात आहेत.
हकीम हे प्रेसिडेन्सीळ तुरुंगातून सोडल्यानंतर घरात स्थानबद्धेत ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या घराबाहेर सीसी टीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App