तामिळनाडू: रॅलीदरम्यान कमल हसनचे ‘ दशावतारम ‘ ; फेकले आपल्याच पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘ फ्लॅशलाइट
तामिळनाडूमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मक्कल नीधी मैम (एमएनए) नेते कमल हसन यांनी रोड शो दरम्यान आपल्याच पक्षाच्या निवडणुकीच्या चिन्हाचा फ्लॅशलाइट फेकला.
कमल हासन यांनी 2018 मध्ये आपला राजकीय पक्ष सुरू केला आणि निवडणूकही लढवली. त्यांच्या पक्षाने मतं जिंकली पण त्यांना उल्लेखनीय विजय मिळवता आला नाही. आता ते आणखी एका निवडणुकीची तयारी करत आहेत.Throw your own election signs! Kamal Hassan’s ‘Dashavataram’ during rally
विशेष प्रतिनिधी
कोयंबटूर: तामिळनाडूमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, मक्कल नीधी मयिम (एमएनए) नेते कमल हसन हे प्रचारादरम्यान हताश झालेले दिसून आले.त्यांनी रागारागात आपल्याच पक्षाचे निवडणूक चिन्ह फेकून दिले . मोर्चाच्या वेळी हातात धरलेला मायक्रोफोन काम करत नसल्यामुळे रोड शो दरम्यान कमल हासन भयंकर चिडले आणि त्यांनी हातातले पक्ष चिन्हं फ्लॅशलाइट फेकले. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
कमल हासन यांनी फ्लॅशलाइट फेकल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. कमल हासन हे कोयंबटूर दक्षिण मतदारसंघातून भाजप आणि कॉंग्रेसविरोधात उभे आहेत. जीथे 2016 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने विजय मिळविला होता.
When @ikamalhaasan lost his 'cool'.. https://t.co/qikSALEJoN pic.twitter.com/SQHPbtdZlH — Pramod Madhav (@PramodMadhav6) March 31, 2021
When @ikamalhaasan lost his 'cool'.. https://t.co/qikSALEJoN pic.twitter.com/SQHPbtdZlH
— Pramod Madhav (@PramodMadhav6) March 31, 2021
कमल हासन आपली पहिली निवडणूक कोयंबटूर दक्षिण येथून लढवणार आहेत. त्यांच्या या पक्षाला तीन वर्ष झाले आहेत आणि त्यांच्या मक्कल नीडि माईम या पक्षाचा सामना भाजप आणि कॉंग्रेस या अनुभवी राष्ट्रीय पक्षांशी होणार आहे. भाजपाने महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांना उमेदवारी दिली आहे, तर कॉंग्रेसने 2016 च्या निवडणुकीत कोयंबटूर दक्षिण येथे उपविजेते म्हणून दाखल झालेल्या मयूरा जयकुमार यांना उमेदवारी दिली आहे.
234 जागांसाठी 6 एप्रिल रोजी निवडणुका
तामिळनाडूमधील पंधराव्या विधानसभेची मुदत 2 मे 2021 रोजी कालबाह्य होत आहे. तामिळनाडूमधील सोळाव्या विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6,28,23,749 मतदार प्रतिनिधींची निवड करतील. तामिळनाडू विधानसभेच्या 234 जागांसाठी 6 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत आणि 2 मे रोजी मतमोजणी होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App