दाटून कंठ येतो; कामगार स्वगृही जातो!!

विशेष प्रतिनिधी

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये केलेला वादा 2024 मध्ये पूर्ण केला पंतप्रधानांनी सोलापुरात पीएम आवास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या पंधरा हजार घरांचे वाटप तिथल्या कामगारांना केले त्यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांचा कंठ दाटून आला कारण कामगार आपल्या स्वगृहात जात होते!!Throat becomes thick; The worker goes home!!

सोलापुरात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी भावूक झाले. ‘जर मला लहानपणी अशा घरात रहायला मिळाल असतं तर…’ हे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोळ्यात अश्रू तरळले. काही सेकंद ते थांबले. त्यांचा कंठ दाटून आला होता, त्यावेळी मोदी म्हणाले की, आज मी या गोष्टी पाहतो, तेव्हा मनाला समाधान मिळते. हजारो कुटुंबचा स्वप्न साकार होत आहे!!



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर उद्घाटनाचा उल्लेख केला. आपल्या सर्वांसाठी ही भक्तीरसाने भरलेली वेळ आहे. 22 जानेवारीला तो ऐतिहासिक क्षण येणार आहे, ज्यावेळी भगवान राम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होतील. अनेक दशकापासूनचा आराध्यच तंबूत दर्शन घेताना होणारा त्रास दूर होणार आहे. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेआधी काही संतांच्या मार्गदर्शनानुसार मी काही गोष्टींचे पालन करतोय. हा योगायोग आहे, माझ्या अनुष्ठानाची सुरुवात नाशिक पंचवटीमधून झाली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे रामराज्यच आहे

श्रीरामच्या आदर्शानुसार देशात सुशासन आणायचा आमच्या सरकारचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न आहे. देशात प्रामाणिक राज्य असले पाहिजे. हे रामराज्यच आहे, ज्याने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयासची प्रेरणा दिली. माझ सरकार गरीबांना समर्पित आहे हे मी 2014 मध्ये सरकार बनल्यानंतरच म्हटले होते. आम्ही अशा योजना सुरु केल्या की, त्यामुळे गरीबांच्या अडचणी कमी व्हाव्यात जीवन सोप बनेल.

Throat becomes thick; The worker goes home!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात