मध्य प्रदेशात खरगोन मध्ये रामनवमी मिरवणुकीवर दगड फेकले; दगडफेक्यांच्या मालमत्तांवर मामाने बुलडोजर चालवले!!

वृत्तसंस्था

खरगोन : मध्य प्रदेशात खरगोन मध्ये काल समाजकंटकांनी श्री राम नवमीच्या मिरवणुकीवर दगड फेकले. आज या समाजकंटकांच्या बेकायदा मालमत्तांवर मामाने बुलडोजर चालवले.मध्य प्रदेशात खरगोन मध्ये काल राम नवमी निमित्त भव्य मिरवणूक झाली.Threw stones at the Ram Navami procession in Khargone in Madhya Pradesh; Uncle drives bulldozer on stone thrower properties

या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली आणि शहरांमधली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत समाजकंटकांना आवरले. काल त्यानंतर मिरवणूक शांततेत पार पडली. पण आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी समाजकंटकांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.



त्यानंतर इंदूरचे विभागीय आयुक्त पवन शर्मा यांनी प्रत्यक्ष खरगोनला भेट दिली. त्यावेळी ते शिवराज मामांच्या आदेशानुसार बुलडोजर बरोबर घेऊन गेले होते. दरम्यानच्या काळात दगडफेक करणाऱ्या 84 समाजकंटकांना मध्य प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले तर यापैकी ज्या समाजकंटकांच्या मालमत्ता बेकायदा आहेत, या बेकायदा मालमत्तांवर प्रशासनाने कायदेशीर कारवाई करत बुलडोजर चालवले. सध्या खरगोनमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

उत्तर प्रदेशात जसे योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोजरची क्रेझ तयार झाली आहे, समाजकंटकांच्या मालमत्तांवर योगी आदित्यनाथ कायदेशीर कारवाई करत बुलडोजर चालवत आहेत. तसेच पाऊल मध्य प्रदेशात शिवराज सिंग चौहान यांनी उचलले आहे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोजरला “बाबा का बुलडोजर” म्हणतात, तर मध्यप्रदेशात “मामा का बुलडोजर” म्हणतात. खरगोन मध्ये हाच मामाचा बुलडोजर चालला आहे.

Threw stones at the Ram Navami procession in Khargone in Madhya Pradesh; Uncle drives bulldozer on stone thrower properties

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात