‘’प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावणारे आज घरी बसले आहेत आणि रामाला मानणारे सत्तेवर आले आहेत.’’ असा टोलाही विरोधकांना लगावला आहे.
विशेष प्रतिनिधी
अयोध्या : ‘’रामाला मानणारेच देशावर राज्य करतील. जे प्रभू रामाबद्दल बोलतील तेच देशावर राज्य करतील. भगवान श्री रामाच्या या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मी तुमचे खूप आभार मानतो. आज अयोध्या शहरात झालेल्या अशा भव्य स्वागताने मी भारावून गेलो आहे, मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.’’ अशा शब्दांमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत आपल्या भावना व्यक्त केल्या. Those who talk about Lord Rama will rule the country Devendra Fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा व शिवसेनेचे मंत्री व नेत्यांनी आज अयोध्ये प्रभू रामाचं दर्शन घेतलं आणि महाआरती सुद्धा केली. यानंतर जाहीर भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्येतील नागरिकांना उद्देशून म्हणाले, ‘’तुम्ही ज्याप्रकारे अयोध्येच्या भूमीवर आमचं स्वागत केलं आहे, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने अतिशय आभार मानतो. आज प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन आम्ही सर्वजण धन्य झालो आहोत. हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर तर मला असं वाटतं आहे की, जीवनातली सर्व सुखं आम्ही मिळवली. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो.’’
‘’… त्यामुळे तुम्ही याला हिंदूराष्ट्र म्हणा किंवा म्हणू नका, हे हिंदूराष्ट्रच आहे; ते काय म्हणतात मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही‘’
याचबरोबर, ‘’आज जे मंदिराचे निर्माण होत आहे, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचेही मी आभार व्यक्त करतो. देशात रामराज्यचं चालेल, रामाला मानणारेच देशावर राज्य करतील. ”जो राम जी की बात करेंगे वो ही देश पे राज करेंगे”. प्रभू रामाला मानणारे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. महाराष्ट्रातही प्रभू रामाला मानणारं सरकार आलं आहे.’’ असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
https://youtu.be/SLL0BKV9iQY
याशिवाय, ‘’जे प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावत होते, विचारत होते काय पुरावा आहे की प्रभू रामाचा जन्म अयोध्येत झाला होता? ते घरी बसले आणि जे प्रभू रामाला मानत होते, ते सरकारमध्ये आले. ही प्रभू रामाची महीमा आहे, ही महीमा आमच्या हनुमंताची आहे.’’ असं म्हणथ त्यांनी काँग्रेसह विरोधकांवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App