सगळ्यात स्वस्त कारच्या फॅक्टरीला बंगालबाहेर घालवणारे आता सर्वात महागड्या कारच्या फॅक्टरीला निमंत्रित करताहेत!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगातल्या सगळ्यात स्वस्त कारच्या फॅक्टरीला बंगाल बाहेर घालवणारे नेते आता जगातल्या सर्वात महागड्या कारच्या फॅक्टरीला गुंतवणूक करण्यासाठी राज्यात बोलवत आहेत, असे टीकास्त्र प्रख्यात बांगला लेखिका तस्लिमा नसरीन यांनी सोडले आहे. जगातली जाएंट इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांना पश्चिम बंगाल सरकारने राज्यात गुंतवणूकीसाठी निमंत्रण दिले आहे. या पार्श्वभूमीवर तस्लिमा नसरीन यांनी टीकास्त्र सोडले आहे. Those who drove the cheapest car factory out of Bengal are now inviting the most expensive car factory !!



पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी राजवटीने 1990 च्या दशकात सिंगर मधून टाटाची नॅनो कारची फॅक्टरी घालवली होती. जगातली सर्वात स्वस्त कार बनवण्याची टाटांची महत्त्वाकांक्षा होती. ती ममता बॅनर्जी यांनी बंगालमध्ये साकारू दिली नव्हती. टाटांनी नॅनोची फॅक्टरी गुजरातमध्ये नेली. त्यांना सध्याचे पंतप्रधान आणि त्या वेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहकार्य केले होते. बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारने त्यावेळच्या सर्वात स्वस्त कारच्या फॅक्टरीला बंगालमध्ये बंगाल मधून बाहेर घालवले होते आणि आता जगातली सर्वात महागडी कार नविणार्‍या कंपनीला मात्र त्यांचे सरकार गुंतवणूकीसाठी निमंत्रण देत आहे. यातली विसंगती तसलिमा नसरीन यांनी चपखलपणे टिकली आहे.

मात्र यावरून तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते साकेत गोखले यांनी तस्लिमा नसरीन यांना फटकारले आहे. व्हिसाची मुदतवाढ जवळ आलेली दिसते आहे. तस्लिमा नसरीन यांना भारतात राहायचे असल्याने केंद्र सरकारची स्तुती करण्यावाचून पर्याय नाही, अशा आशयाचे ट्विट साकेत गोखले यांनी केले आहे.

Those who drove the cheapest car factory out of Bengal are now inviting the most expensive car factory !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात