सब के बॉस तो हम है!!, असे मानणाऱ्यांना भारताचा विकास सहन होत नाही; राजनाथ सिंहांचा ट्रम्प तात्यांना टोला!!

Rajnath Singh

वृत्तसंस्था

नवी दिल्ली :   भारतावर जादा टेरिफ लादून दादागिरी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज जोरदार टोला हाणला‌. सब के बॉस तो हम है!!, असे समजणाऱ्यांना भारताचा विकास सहन होत नाही, पण भारत वेगाने प्रगती केल्याशिवाय राहणार नाही. जागतिक आर्थिक महासत्ता बनल्याशिवाय थांबणार नाही, अशा शब्दांमध्ये राजनाथ सिंह यांनी ट्रम्प तात्यांना सुनावले.Those who believe that we are all bosses cannot tolerate India’s development; Rajnath Singh hits out at Trump!!

भारताच्या प्रगतीच्या गतीचे वर्णन करताना राजनाथ सिंह म्हणाले, जगात सगळीकडे अस्थिर वातावरण असताना भारताची अर्थव्यवस्था ब्राईट स्पॉट ठरली आहे. पण सब के बॉस तो हम है!!, असे समजून चालणाऱ्यांना भारताच्या विकासाची गती सहन होत नाही. भारतात आणि भारतीयांनी तयार केलेल्या वस्तू जगभरातल्या बाजारात स्वस्तात मिळता कामा नयेत, त्या महाग व्हाव्यात यासाठी काही “व्यवस्था” कामाला लागल्यात. भारताच्या वस्तू महाग झाल्या की त्यांना जागतिक बाजारात स्थान मिळणार नाही असे काही शक्तींना वाटते.Rajnath Singh



 

पण म्हणून भारताची आर्थिक प्रगतीची गती धीमी होणार नाही. भारताला रोखण्याची आता जगातल्या कुठल्याच शक्तीमध्ये ताकद नाही.

संरक्षण सामग्री क्षेत्रात भारत पूर्वी फक्त शस्त्रे, विमाने आणि अन्य सामग्री आयात करायचा‌. कारण भारतामध्ये या वस्तू बनायची शक्यता निर्माण केली नव्हती. 2014 च्या आधी भारत फक्त 600 कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्रीची निर्यात करायचा. पण भारत आता 24000 कोटी रुपयांच्या संरक्षण सामग्रीची निर्यात करतो. आत्मनिर्भर भारत संकल्पनेमुळे हे शक्य झाले.

Those who believe that we are all bosses cannot tolerate India’s development; Rajnath Singh hits out at Trump!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात