मनात नेहरू + इंदिरा, ओठांवर गांधी + पटेल; पण काँग्रेसचे हे नवे सूत्र जनतेला “पटेल”??

 

नाशिक : मनात नेहरू + इंदिरा, ओठांवर गांधी + पटेल; पण काँग्रेसचे हे नवे सूत्र जनतेला “पटेल”??, हे शीर्षक आकाशातून पडून सूचलेले नाही, तर ते काँग्रेसने केलेल्या राजकीय बदलातून सूचलेय. काँग्रेसने अहमदाबादेतल्या महाअधिवेशनात नेहरू + इंदिरा + राजीव असा जयघोष करण्याऐवजी गांधी + पटेलांचा जयघोष केला. काँग्रेस कार्यकारिणीच्या सगळ्या सदस्यांनी काल सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राष्ट्रीय स्मारकाला सकाळी भेट देऊन तिथे मोठे फोटोसेशन केले. सायंकाळी साबरमती आश्रमात जाऊन तिथल्या सायंप्रार्थनेत ते सहभागी झाले. काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया हँडलवर तर बापूंचा आदर्श आणि सरदार पटेल यांचा दृढनिश्चय यांच्या आधारे काँग्रेस कार्यकर्ते आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असल्याचे लिहिले. पण त्यामुळेच मनात “नेहरू + इंदिरा आणि ओठांवर गांधी + पटेल” हे शीर्षक सूचले.

कारण काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीपासून ते सरदार पटेल यांच्या राष्ट्रीय स्मारकापर्यंत आणि साबरमती आश्रमात सगळीकडे सोनिया गांधी + राहुल गांधी पुढे होते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे त्यांच्या सावलीत वावरत होते. काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनावर पूर्णपणे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची छाया पसरलेली दिसली. म्हणून तर सचिन पायलट यांच्यापासून ते प्रताप खाचरियावास या नेत्यांपर्यंत सगळ्यांनी देश आता राहुल गांधींकडे आशेने पाहात असल्याची वक्तव्ये केली. एका अर्थाने राहुल गांधींच्या किमान पाचव्या सातव्या “रीलॉन्चिंगचे” हे महाअधिवेशन ठरले. तिकडे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी कन्हैया कुमारचे “लॉन्चिंग” केले. स्वतःचे “रीलॉन्चिंग” यशस्वी होवो किंवा न होवो, बिहारमध्ये कन्हैया कुमारला आणून लालूप्रसादांच्या तेजस्वीला अडवायला काय हरकत आहे??, असा विचार राहुल गांधींनी केला.

पण त्या पलीकडे जाऊन काँग्रेसने मात्र मनात नेहरू + इंदिरा आणि ओठांवर गांधी + पटेल हे धोरण अवलंबत राजकीय बदल केला. काँग्रेसवरच्या नेहरू + गांधींच्या वर्चस्वाच्या काळात सरदार वल्लभभाई पटेल यांचा प्रथमच काँग्रेस कडून उदो उदो झाला. वास्तविक काँग्रेस पक्ष संघटनेने सरदार पटेल यांना नेहमीच आपले सर्वोच्च नेता मानले होते. कारण काँग्रेसच्या त्या वेळच्या १४ प्रदेश संघटनांपैकी ११ प्रदेश संघटनांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ऐवजी सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला होता. पण महात्मा गांधींनी आपले वजन जवाहरलाल नेहरूंच्या पारड्यात टाकल्याने नेहरू पंतप्रधान झाले आणि वल्लभभाई दुसऱ्या क्रमांकाचे नेते झाले होते. त्यानंतर नेहरू गांधी परिवाराच्या वर्चस्वादरम्यान वल्लभभाई पटेल यांचे राजकीय महत्त्व टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. ते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभारण्यापर्यंत काँग्रेसचे “ते” धोरण कायम होते. पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे आपल्या वेगवेगळ्या भाषणांमध्ये नेहमी महात्मा गांधींचा उल्लेख करत असत. इंदिरा गांधींनी त्यामध्ये नेहरूंचे नाव ऍड केले. त्यानंतर राजीव गांधींनी महात्मा गांधी पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी अशी नावे घ्यायला सुरुवात केली होती.‌ पण 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचे एवढे मोठे “ब्रॅण्डिंग” केले की, काँग्रेसला वल्लभभाई पटेल “आमचे” होते, असे म्हणण्यावाचून पर्यायच उरला नाही. म्हणूनच गुजरात मध्ये काँग्रेसचे अधिवेशन घेताना काँग्रेसच्या नेत्यांना महात्मा गांधी बरोबर सरदार पटेल यांचा उदो उदो करावा लागला.

– सोनिया गांधींची छाप

पण म्हणून आजच्या काँग्रेसमध्ये नेहरू‌ + इंदिरा यांचे वर्चस्व कमी झाले असे मानायला वाव नाही. कारण काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनावर सोनिया गांधींची छाप राहिली. त्यांच्या पाठोपाठ राहुल गांधींचा वरचष्मा राहिला आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना या दोन्ही नेत्यांच्या सावलीतच वावरावे लागले.

This new formula of Congress will “understand” the people

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात