नाशिक : बिहारच्या निवडणुकीशी सुतराम संबंध नाही; पण तरीही प्रतिक्रिया देण्याची संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंना घाई!!, असे चित्र बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात दिसले. Sanjay Raut and Supriya Sule
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे कल बाहेर आले. त्यातून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्रचंड बहुमत मिळाले. काँग्रेस + राजद महागठबंधनचा दारुण पराभव झाला. त्या पाठोपाठ संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या vote chori ला पाठिंबा देणारे ट्विट केले. त्यांनी आजारपणामुळे पत्रकार परिषद घेतली नाही पण ट्विट मधून जे बोलायचे तेच बोलले. निवडणूक आयोग आणि भाजप यांनी एकत्र येऊन बिहारची निवडणूक जिंकली ज्यांना प्रचंड बहुमत मिळायची खात्री होती, त्यांना 40 जागांच्या आत आणले. महाराष्ट्राचे जसे निकाल लागले, तसेच निकाल बिहारमध्ये लागले, अशी आगपाखड संजय राऊत यांनी केली.
– शिवसेनेचा त्या निवडणुकीचशी संबंध नाही
संजय राऊत यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा बिहारच्या निवडणुकीशी काहीही संबंध आला नाही. त्यांच्या पक्षाने तिथे जाऊन निवडणूक लढविली नाही. उद्धव ठाकरे किंवा त्या पक्षाचे बाकीचे नेते बिहारमध्ये प्रचाराला फिरकले सुद्धा नाहीत. पण निवडणूक निकालाचे कल आल्याबरोबर संजय राऊत यांनी प्रतिक्रियेचे ट्विट करण्याची घाई मात्र ताबडतोब केली.
– सुप्रिया सुळेंना प्रतिक्रियेची घाई
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा संजय राऊत यांच्याच पावलावर पाऊल टाकले. त्यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. नितीश कुमार यांचे विशेष अभिनंदन केले. तेजस्वी यादव आणि काँग्रेसच्या नेत्यांशी संध्याकाळी बोलून बिहार मधल्या पराभवाचे विश्लेषण करू आणि नंतर पत्रकारांना सांगू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार हे फार मोठे राष्ट्रीय नेते असून सुद्धा ते बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या दिशेने साधे फिरकले सुद्धा नव्हते. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे निवडणूक लढविली नव्हती. त्यामुळे शरद पवारांनी किंवा सुप्रिया सुळे यांनी बिहार मध्ये जाऊन प्रचार करायचा प्रश्नच उद्भवला नव्हता. कारण काँग्रेसने सुद्धा त्यांना प्रचाराचे निमंत्रण दिले नव्हते.
पण निवडणुकीच्या निकालाचे कल आले आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी घाईने पत्रकार परिषद घेऊन त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. सगळ्या विरोधी पक्षांना आत्मपरीक्षण करायचा सल्ला दिला. जणू काही सुप्रिया सुळे यांनी तो सल्ला दिला नसता, तर तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या पक्षांनी आत्मपरीक्षण केलेच नसते, असा आव सुप्रिया सुळे यांनी आणला.
– फडणवीस + शिंदे बिहारमध्ये प्रचारात
त्याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिहारमध्ये जाऊन प्रचार सभा घेतल्या. मात्र त्याचवेळी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्रातच थांबले होते. मात्र, या तिन्ही नेत्यांनी घाई गर्दीने कुठली प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळले. त्यांच्या आधी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनीच प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App