वाहतूक कोंडीतून होणार सुटका ; जाणून घ्या, किती किलोमीटर लांब असणार?
विशेष प्रतिनिधी
हिमाचल : Ropeway दरवर्षी देशभरातून आणि जगभरातून लाखो लोक हिमाचल प्रदेशात येतात. प्रत्येकजण इथे फिरायला आणि मजा करायला येतो. अशा परिस्थितीत हिमाचलमध्ये वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी, हिमाचलमध्ये जगातील सर्वात लांब रोपवे बांधला जाणार आहे. हिमाचलमधील पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी, येथील सरकार शिमला ते परवाणू पर्यंत जगातील सर्वात लांब रोपवे बांधणार आहे.Ropeway
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा रोपवे ४०.७३ किलोमीटर लांबीचा असेल. प्रस्तावित रोपवे शिमला ते परवानु शहराला जोडेल. रस्त्याने या दोघांमधील अंतर अंदाजे ८० किलोमीटर आहे. सोलन जिल्ह्यातील परवाणू येथून शिमलाला रस्त्याने जाण्यासाठी सुमारे २ ते ३ तास लागतात. यामुळे रोपवेने प्रवास करण्याचा बराच वेळ वाचेल. दर तासाला सुमारे २००० लोक रोपवेने प्रवास करू शकतील.
रोपवेने प्रवास करताना, सुंदर पर्वत आणि हिरवळीचे दृश्य अनुभवता येते. लोकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल. हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे. हा रोपवे अंदाजे ४० किलोमीटर लांबीचा असेल. ते बांधण्यासाठी ५,६०० कोटी रुपये खर्च येईल आणि पाच वर्षे लागतील. एकदा ते तयार झाले की, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. शिमलाला जाणाऱ्या एकमेव महामार्गावरील वाहतूक कोंडीतून लोकांना दिलासा मिळेल. ही जगातील आतापर्यंतची सर्वात लांब रोपवे प्रणाली असेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App