वीर बाल दिवसाच्या रूपाने एक नवा अध्याय सुरू झाला आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे वीर बाल दिवस कार्यक्रमाला संबोधित केले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, वीर बाल दिवसाच्या रूपाने एक नवा अध्याय सुरू झाला आहे.The worlds attitude towards our tradition has changed PM Modis statement in the Veer Bal Diwas program
वीर बाल दिवस हे भारतीयत्वाच्या रक्षणासाठी काहीही करण्याच्या संकल्पाचे प्रतीक आहे. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की शौर्याच्या पराकष्टेच्या तुलनेत कमी वयाने काही फरक पडत नाही. शूर साहिबजादांकडून संपूर्ण देश प्रेरणा घेत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.
तसेच ते म्हणाले, ‘अन्याय आणि अत्याचाराचा पूर्ण अंधार असतानाही निराशेला क्षणभरही वरचढ होऊ दिले नाही. आपण भारतीयांनी अत्याचार करणाऱ्यांचा स्वाभिमानाने सामना केला. प्रत्येक युगातील आपल्या पूर्वजांनी सर्वोच्च बलिदान दिले. स्वत:साठी जगण्याऐवजी या मातीसाठी मरण्याचा त्यांनी संकल्प केला. जोपर्यंत आपण आपल्या वारशाचा आदर करत नाही तोपर्यंत जगानेही आपल्या वारशाची कदर केली नाही. आज जेव्हा आपल्याला आपल्या वारशाचा अभिमान वाटू लागला आहे, तेव्हा जगाचा दृष्टीकोनही बदलला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App